अमळनेर फार्मसी महाविद्यालयाचा १००% निकाल*
1 min read

अमळनेर फार्मसी महाविद्यालयाचा १००% निकाल*

Loading

*अमळनेर फार्मसी महाविद्यालयाचा १००% निकाल*

खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व.पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी.फार्मसी येथील पदविका अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या प्रथम वर्ष व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या अंतिम परिक्षेत घवघवीत यश संपादन केले व महाविद्यालयाचा निकाल १००% राखण्यात यश मिळवले.
प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी कु.आरती बोरसे ७८ टक्के गुण मिळवून प्रथम. कु.अलफरान बेलदार ७४ टक्के मिळवून द्वितीय. कु. वरूण पाटील ७३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
त्याप्रमाणेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी कु.प्राची चौधरी ८१ टक्के गुण मिळवून प्रथम. कु.दिपाली सुर्यवंशी ८० टक्के गुण मिळवून द्वितीय व कु.कुलदिप्ती ७९ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकांने उत्तीर्ण झाले.
महाविद्यालयाचे कुशल मार्गदर्शक व प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र स. सोनवणे, औषधनिर्माणशास्त्र पदविका विभागातील जेष्ठ प्रा.अनिल बोरसे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा.हर्षदा पवार यांचे सर्व सहकारी प्रा.मानसी उपासनी, प्रा.शिवानी शर्मा, प्रा.प्रियंका महाजन, प्रा.वैशाली कुळकर्णी यांनी शैक्षणिक सुरूवातीपासून सुयोग्य नियोजन करून विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट तयारी करून घेऊन परिक्षेविषयी योग्य मार्गदर्शन केले.

सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ.संदेश बी. गुजराथी फार्मसी विभागाचे चेअरमन मा.योगेशजी मुंदडे,खा.शि.मंडळाचे चिटणीस प्रा.पराग पी. पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र सोनवणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *