नोबल सायन्स टॅलेंट सर्च (2025) परीक्षेत आर्मी स्कूलच्या छोट्या जवानांचे यश..!*_
![]()
_*नोबल सायन्स टॅलेंट सर्च (2025) परीक्षेत आर्मी स्कूलच्या छोट्या जवानांचे यश..!*_
जळगाव येथील नोबल फाउंडेशन यांनी घेतलेल्या *”नोबल सायन्स टॅलेंट सर्च 2025 (NSTS-2025)”* या परीक्षेत आपल्या विजयाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू.कॉलेजचे तीन विद्यार्थी ॲडव्हान्स लेवलला पात्र ठरले आहेत..
महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रात अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 429 विद्यार्थी ॲडव्हान्स लेवलला पात्र झाले आहेत. आपल्या विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे दहापैकी तीन विद्यार्थी हे ॲडव्हान्स लेवलला पात्र झाले आहेत. त्यात इयत्ता सहावीचा _*इशांत कैलास धनगर*_ व सातवीचे _*भूमीत ईश्वर धनगर*_ व _*जयेश अरुण धनगर*_ या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.. शंभर गुणांच्या या परीक्षेत ईशांतने 82 गुण मिळवत 156 वा क्रमांक प्राप्त केला आहे.. तर भूमीत याला 65 व जयेश याला 54 गुण मिळाले असून भूमीत व जयेशला अनुक्रमे 347 व 405 क्रमांक प्राप्त झाला आहे..
नोबल फाउंडेशन,जळगाव चे सर्वेसर्वा व संस्थापक अध्यक्ष श्री.जयदीप पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी महाराष्ट्रातील विविध केंद्रात ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा तीन गटात घेतली जाते. या परीक्षेच्या लेखी,ॲडव्हान्स लेवल आणि मुलाखत अशा तीन पायऱ्या आहेत. अंतिम मुलाखतीत उत्तीर्ण होणाऱ्या 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना इसरो (ISRO), IIT, IGM सारख्या विविध वैज्ञानिक संस्थांना नोबल फाउंडेशन तर्फे विनामूल्य सहलीची मेजवानी दिली जाते..तर ॲडव्हान्स लेवल मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची पुस्तके दिली जातात व लेखी परीक्षेत बसलेल्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाते. नोबल सायन्स टॅलेंट सर्च या परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागली आहे..
आर्मी स्कूलच्या या तीनही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री नानासाहेब विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब अनिकेत पाटील, मार्गदर्शिका शीलाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी डी.बी.पाटील, प्रा.शाम पवार, मानद शिक्षण संचालक प्रा.सुनील गरुड, प्राचार्य श्री.अनिल डी.पाटील, कमांडंट लेफ्टनंट कर्नल विजयसिहं थोपटे,सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत..

