योग म्हणजे मन आणि चित्तात अमर्याद आनंदाची अनुभूती!!! ‌
1 min read

योग म्हणजे मन आणि चित्तात अमर्याद आनंदाची अनुभूती!!! ‌

Loading

योग म्हणजे मन आणि चित्तात अमर्याद आनंदाची अनुभूती!!!

भारतीय संस्कृतीचे अनमोल देणगी म्हणजे योग होय. भारतामध्ये सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये अनेक शास्त्रांचा अभ्यास करण्यात आला. त्या काळामध्ये भारतात अनेक विद्यापीठ होती. तक्षशिला, नालंदा, वल्लभी यासारख्या विद्यापीठांत योगशास्त्र शिकवले जात होते. योगशास्त्रात मन व चित्त याला परमोच्य आनंद मिळवून देणार शास्त्र होय. योगाचार्य पतंजली हे सुद्धा या विद्यापीठातील विद्यार्थी होते. महर्षी पतंजली यांनी पुढे योगशास्त्राचा अभ्यास करून पतंजली ऋषी यांनी योगदर्शन नावाचा ग्रंथ लिहला. त्याला योगसूत्र म्हटले जाते. त्यात अष्टांग योगाची मांडणी केलेली आहे. पतंजलीच्या या संस्कृत ग्रंथांमध्ये योगा बद्दल संपूर्ण मार्गदर्शन दिलेले आहे. योग म्हणजे व्याकरणकार पाणिनीच्या भाषेत जुळणे होय. मन आत्मा, शरीर याचे जोडले जाणे, एकत्रित होणे याला योग म्हणतात. शरीर ,मन चित्त ,आत्मा याचे एकत्र येणे म्हणजे योग होय. योग हा शब्द युज या धातूपासून तयार झालेला आहे. युज याचा अर्थ समन्वय. भारतीय विद्वानांमध्ये अनेक सिद्धांत प्रचलित आहेत. प्रत्येक विद्वानांनी मांडलेला सिद्धांत अप्रतिम आहे. शंकराचार्य चा अद्वैत सिद्धांत, माधवाचार्याचा द्वेताद्वेत, चार्वाक, लोकायत, गौतम बुद्ध यांनी विविध संशोधन करून अध्यात्मातील तत्त्वज्ञानात भर पाडली. सिंधू संस्कृती ही भारतीयांची मूळ संस्कृती आहे. या संस्कृतीने आम्हाला खगोलापासून ते विविध ज्ञानमार्गापर्यंत ज्ञान पुरविले आहे. महर्षी पतंजली यांनी या संस्कृतीत ज्ञानग्रहण करून योगावर अप्रतिम ग्रंथ लिहिला. सिंधू संस्कृतीतील हे ज्ञान बुद्धकाळात विदेशापर्यंत पोहोचले. विविध ध्यान पद्धती, समाधीयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोग, कर्मयोग यासारखे जीवनाला चकाकी आणणारे कर्मकांड विरहित ज्ञान निर्माण झाले. योगामुळे मानवाच्या कायिक,वाचिक,मानसिक आरोग्याचे भरण पोषण होते. बुद्धकाळातील त्यांचे अनुयायी ध्यान धारणा करीत असत. बुद्धाने अंतिम टोक ध्यानधारणाच असे कधी म्हटले नाही. मानवाचा विकास हा प्रत्यक्ष आचारणाने होतो यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे विपश्यना हे मानवाच्या विकासाचे अंतिम टोक आहे हे त्यांनी मानले नाही. परंतु मानवाला आचार, विचार ,उच्चार , मन शुद्धीसाठी ध्यानधारणा महत्त्वाची मानली. गौतम बुद्धांनी सर्व सिद्धांताचा सूक्ष्म विचार करून प्रत्यक्ष अनुभवून सर्वसामान्य माणसांना स्वीकारता येईल असा मार्ग जगाला दिला. अष्टांगिक मार्ग हा त्यांचा उज्वल भविष्यासाठी व विवेकी जीवनासाठी मूलमंत्र ठरला. आज जो प्राणायाम, आसने करणे हा शरीर शुद्धीसाठीचा उत्तम मार्ग आहे. रामदेव महाराज जे योग करतात तो प्राथमिक अवस्थेचा आहे. जगाकडे पाहण्याची संपूर्ण दृष्टी बदलणे व त्याच पद्धतीने जीवन जगणे हा खरा योग आहे. शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक लिहिले आहे त्यात त्यांनी महायोग शब्दाच्या वापर केलेला आहे. शंकराचार्यांच्या अद्वैत सिद्धांतानुसार आत्म्याचे परमात्म्याशी मिलन म्हणजे महायोगी. त्यासाठी त्यांनी पांडुरंगाष्टकाच्या पहिल्याच कडव्यात “महायोग पिठे तटे भीमरथ्या , वरम पुंडलिकाय धातू मुनींदरै…”या कडव्यामध्ये त्यांनी पुंडलिकाचे विठ्ठलाशी होणारे समर्पण म्हणजे महायोग म्हटले आहे. भारतात भक्ती मार्ग, ज्ञानमार्ग असे मार्ग अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये दिसून येतात. संत कबीर हे ज्ञानमार्गी संत होत. ते निर्गुण निराकाराचे भक्त होते. सगुण साकार रूप मानणारे पंथ या भूतलावर होऊन गेले. परमेश्वर मूर्तीमध्ये मानण्याची ही सगुण साकार पंथाची परंपरा होती. त्यामुळे परमेश्वराला मूर्तीमध्ये मानून त्याचे गुण स्वीकारण्याची परंपरा होती. कालांतराने त्या परंपरेत अंधश्रद्धा निर्माण झाली. योग करणे हे विवेकी जीवनाचे लक्षण आहे. कोणतीही गोष्ट जी खरी आहे ती स्वीकारत , तर्क करणे ही अध्यात्मातील उच्च प्रतीची अवस्था आहे. चमत्काराला कुठेही थारा नाही. नियमित प्राणायाम, आसने, ध्यान केल्याने शारीरिक व मानसिक चांगले बदल दिसून येतात. भारतात जे लोक योग करतात ते बऱ्यापैकी आजाराला दूर सारतात. आज प्राणायामाच्या प्रचारासोबत काही लोक आपले व्यवसाय वाढवीत आहे. काही लोकांनी व्यवसायामध्ये आयुर्वेदिक जडीबुटी या नावाने दुकाने थाटली आहे. भारतातील मानव कमी खर्चात कसा रोगमुक्त होईल हे त्यांचे ध्येय नाही. एका दिवसाच्या जागृतीने योगाचे जागरण करता येणार नाही. संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत 2014 ला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे ठरविण्यात आले. 21 जून 2015 पासून खऱ्या अर्थाने योग दिन साजरा करण्यात येऊ लागला. भारतामध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वत्र योग दिन साजरा करण्याचे राष्ट्राला आवाहन केले. यावर्षी ‌ भारताच्या कानाकोपऱ्यात योग दिन साजरा करण्याचे शिक्षण विभागाला सुचविण्यात आले. त्यामुळे सर्वत्र योग दिन साजरा करण्यात येत आहे. डब्ल्यू एच ओ या संस्थेने विविध देशातील वाढणाऱ्या रोगाच्या समस्या यामुळे चिंतित होऊन रोगाला दूर करण्यासाठी नागरिकांमध्ये सजकता येण्यासाठी दक्षता घेण्याचे सुचवण्यात आले. वाढत्या वातावरणीय बदलामुळे अनेक आज वाढू लागलेले आहे त्यासाठी नागरिकांची जीवनशैली बदलली पाहिजे अशी जागतिक संघटनेने अभ्यासांती ठरवले आहे. योगामुळे शारीरिक, मानसिक ,आध्यात्मिक विकास करता येतो. सध्याच्या युगात येत असलेला स्पर्धेमुळे ताण तणाव यावर ध्यान साधना करणे फायदेशीर आहे. योग क्रियेत यम ,नियम, प्रत्याहार, आसन, ध्यान, समाधी अशा अवस्था सांगितले आहे. योगामुळे निरोगी जीवन जगता व्याधीमुक्त जीवनासाठी योग महत्त्वाचा आहे. योगामध्ये योग्य आहार यासाठी नियम आहे. त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. संस्कृत मध्ये एक सुविचार आहे. तो म्हणजे योग कर्मसु कौशल्यम ..
आहे . आपले कर्म योग्य पद्धतीने करण्यासाठी योग महत्त्वाचा आहे. योग करणारा व्यक्ती व्यसनापासून दूर राहू शकतो. जगावर येणाऱ्या विविध वातावरणीय आजारांवर योग हा एक चांगला पर्याय आहे. प्रत्येक नागरिकाने योगाच्या मार्फत आपली जीवनशैली ठेवावीअशी अपेक्षा जागतिक आरोग्य संघटनेची आहे.

पत्रकार
सोपान भवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *