वैदीक काळात वाढलेल्या कर्मकांडाविरुद्ध शुद्ध आचरणाचा धर्म देणारे वर्धमान महावीर !!!
![]()
वैदीक काळात वाढलेल्या कर्मकांडाविरुद्ध शुद्ध आचरणाचा धर्म देणारे वर्धमान महावीर !!!
भारत देशामध्ये अनेक धर्म आहेत. भारताच्या प्राचीन काळामध्ये आर्य विदेशातून आल्यानंतर त्यांनी वैदिक काळामध्ये विविध ग्रंथ तयार केले. त्यामध्ये चार वेद, ब्राह्मण्ये, आरण्यके, उपनिषद यासारख्या ग्रंथांची निर्मिती केली. कालांतराने या ग्रंथांचे अनुकरण करण्याची शक्ती वाढल्याने त्या काळात पुरोहितांची मक्तेदारी वाढली. त्यांच्या वाढलेल्या धर्मांधतेमुळे कर्मकांड फोफावले. कर्मकांड, पाप ,पुण्य, स्वर्ग नरक याची भीती समाजामध्ये मनुवाद्यांनी वाढविली. नंतर आचरणाला महत्त्व न राहता भंपकगीरी वाढली. मूर्ती पूजेबद्दल अंधश्रद्धा वाढल्या. अशा काळामध्ये आयोध्या येथील राजा ऋषभ देव यांनी जनतेच्या कल्याणासाठी पर्यायी शुद्ध आचरणाचा मार्ग दिला. त्यावेळी त्यांनी आपले राजपद सोडून समाजामध्ये जनजागृती केली. ते आयोध्या येथील राजे होते. शेती ,व्यापार, कला, हस्तकला व निर्मळ आचरण याला त्यांनी महत्त्व दिले. ऋषभ देवांना आदिनाथ म्हटले जाते. तेच जैन धर्माचे पहिले तीर्थकर आहेत. जैन धर्माची खरी सुरुवात त्यांनी केली. ऋषभ देव यांच्या वडिलांचे नाव नाभिराज व आईचे नाव मनुदेवी होते. जैन धर्मामध्ये एकूण २४ तीर्थकर झालेले आहेत. त्यांचे २३ वे तीर्थकर पार्श्वनाथ हे होते. वर्धमान महावीर यांचा जन्म बिहार राज्यात कुंडग्राम येथे झाला. काही लोक याला कुंडलपूर असे म्हणतात. वर्धमान महावीर यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ होते. महावीरांच्या आईचे नाव त्रिशला होते. महावीरांवर जैन धर्माचे २३ वे तीर्थकर पार्श्वनाथ यांचा प्रभाव होता. महावीरांना कुणी गुरू नव्हते. त्यांनी आपल्या तपसाधनेने ज्ञान मिळवलेले होते. जैन धर्म शुद्ध आचरणावर भर देणारा धर्म आहे. चांगले वागणे, हिंसा न करणे, चोरी न करणे, साधे जीवन जगणे या तत्वावर चालणारा धर्म आहे.
वर्धमान महावीर यांनी जैन धर्म स्थापन केला नाही परंतु जैन धर्मातील शुद्ध आचरणाचे नियम तयार केले. जैन धर्मअधिक पारदर्शक व सत्त्यावर उभा केला. जैन धर्माचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात केला. जैन धर्म व बौद्ध धर्म समकालीन होते. बुद्धाच्या तत्त्वज्ञानामध्ये शुद्ध आचरणाला महत्त्व आहे. जैन व बुद्ध या धर्मांनी मूर्ती पूजेला कडाडून विरोध केला. मानवाच्या उन्नतीचा खरा मार्ग दाखविला. बिहार मधील वैशाली नगर हे बिहारची त्या काळातील राजधानी होती. वैशाली जवळचा कुंडग्राम हा एक भाग होता. वर्धमान महावीर यांनी १२ वर्ष तपश्चर्याकडून जैन धर्म अधिक प्रभावी बनवला. जैन धर्मामध्ये स्त्री व पुरुष यांना समान स्थान दिले. जैन धर्मामध्ये श्वेतांबर आणि दिगंबर असे प्रकार आहेत. दिगंबर पंथी हटयोगा प्रमाणे कडक आचरणाला प्राधान्य देणारा आहे. श्वेतांबर पंथ ही शुद्ध आचरणालाच महत्व देतो. श्वेतांबरी श्वेत वस्त्र म्हणजे पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालून मार्गक्रमण करतात. पांढरा रंग हा शुद्ध पावित्र्याचा रंग आहे. महावीरांनी मिळविलेल्या ज्ञान केवल विशुद्ध होते. त्यामुळे वर्धमान महावीरांना केवली म्हणतात. महावीरांना जीन असेही म्हणतात. जीन म्हणजे इंद्रींयाना जिंकणारा होय. वर्धमान महावीरांनी सुख व दुःख यावर विजय मिळवलेला होता. सुखाने व दुःखाने त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. इंद्रियांना संयमीत ठेवणारे ते गुरु होते.जिन या शब्दावरून जैन नाव पडलेले आहे. वर्धमान महावीर यांनी विकारावर विजय मिळविला. शुद्ध विचाराचा धर्म त्यांनी जगाला दिला. जवळ जवळ ३ दशक चांगला विचाराचा प्रचार महावीरांनी केला. पंचमहा व्रते व त्रिरत्ने याचा वापर आचरणात आणला. मनानेही कुणाचे वाईट चिंतू नये असा अहिंसा सांगणारा मार्ग म्हणजे जैन धर्म होय. वर्धमान महावीर यांचे निर्वाण इसवी सन पूर्व ५२७ ला बिहारमध्ये पावापुरी येथे झाले. जैन धर्मामध्ये अनेक लोक ब्रह्मचर्य स्वीकारून साधू बनतात. आयुष्यभर चांगला विचाराचा प्रचार ते करीत असतात. काही महिला साध्वी सुद्धा होतात. आपण मिळवलेली सत्ता ,संपत्ती ,पैसा इहलोकात सोडून जायचे आहे त्यामुळे त्या गोष्टीचा व शरीराचा कोणताही गर्व करू नये. असा विचार जैन धर्मात मांडलेला आहे. कितीही जवळचा व्यक्ती मृत्युमुखी पडला तरी दुःख व्यक्त करू नये. कारण जैन धर्मात सुख व दुःख याच्या पलीकडे पाण्याची दृष्टी दिलेली आहे. जैन लोक आपल्या जवळच्या व्यक्तीचे देहावसान झाल्यावर कमी दिवसात त्याचे उत्तर विधी आटपतात. गेलेल्या व्यक्तीचे दुःख करीत नाही. जैन समाज उद्योगी समाज असल्याने त्यांनी कर्म काढायला महत्व दिलेले नाही. जैन धर्मात मूर्तिपूजा मानली जात नाही. चांगल्या महापुरुषांच्या विचाराचे अनुसरण केले जाते. जैन साधू, साध्वी आहारावरही पथ्य पाळतात. चमचमीत पदार्थ ते खात नाहीत. कुठेही जाताना पायी फिरत असतात. मनावर ताबा करून साधू व साध्वी जीवन व्यतीत करीत असतात. वर्धमान महावीरांनी मागील तीर्थकारांनी दिलेला विचार अधिक चांगल्या रीतीने समाजाला दिला म्हणून वर्धमान महावीरांना महत्त्व आहे. विनम्रता ही या धर्माची वीट आहे. जैन समाज आपल्या समाजातील कोणतेही कार्यक्रम कमी लोकांमध्ये व चांगल्या पद्धतीने करीत असतात. अतिथी देवो भव या वृत्तीला प्राधान्य देतात. जैन धर्म क्षमा करणारा धर्म आहे. मानवाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये त्याच्याकडून काही प्रमाद झाल्यास , कुणाला शब्दाने दुखवले गेल्यास, नुकसान केले गेल्यास त्या व्यक्तीला क्षमा मागून पुन्हा चांगले जीवन जगता येते. माणूस आहे तो चुकू शकतो व चुका सुधारू शकतो या गोष्टीवर जैन धर्मात विश्वास आहे. आत्मसंयम हा देखील एक चांगला गुण जैन धर्मामध्ये आहे. आपल्या आत्म्याला शुद्ध ठेवण्यासाठी ते प्रयत्न करीत असतात. वर्धमान महावीरांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
उपसंपादक
एस.एच.भवरे
९०७५४१७०३२

