मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने अँड.हर्षिता म्हात्रे हिचा सत्कार…
![]()
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने अँड.हर्षिता म्हात्रे हिचा सत्कार…
ठाणे:कल्याण(प्रतिनिधी) गुंदवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा प्रसिद्ध उद्योजक श्री.प्रमोद अनंत म्हात्रे यांची सुकन्या अँड.कु.हर्षिता मेघा प्रमोद म्हात्रे ही नुकतीच LLB परिक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल तिचे मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने ग्रुपचे प्रमुख तथा आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.श्री.मनिलाल रतिलाल शिंपी, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव डॉ.श्री.यशवंत अनंत म्हात्रे,
पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष अँड.सोमनाथ बाळाराम ठाकरे, स्वामीनारायण मंदिर हॉल चे संचालक डॉ.श्री. दिनेश भाई ठक्कर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन हार्दिक अभिनंदन केले व पुढिल वाटचालीस खुप खूप शुभेच्छा दिल्या.मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप महाराष्ट्र राज्य
संपूर्ण राज्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अंध, अपंग ,निराधार, वीट भट्टी कामगार आदिवासी बांधव, ऊसतोड कामगार बांधवांना शेतामध्ये जाऊन मदतीचा हात पुढे करते त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात फार मोठे उल्लेखनीय सेवाभावी कार्य करीत आहे…विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात शालेय विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी ,त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी देखील सर्वोतोपरी मदत करीत असते. तसेच एम.पी.एस.सी, यू.पी.एस.सी, परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन करून त्यांचे सुयश चिंतिते. त्याचाच एक भाग म्हणून
आज माझी मुलगी कु. हर्षिता LLb कायद्याची परीक्षा पास झाल्याबद्दल मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपच्या वतीने गौरविण्यात आले …वडिल म्हणून मनाला खूप आनंद झाला , अभिमान वाटला
या सत्कार समारंभासाठी उपस्थित सर्वानी माझ्या मुलीचा गौरव करून शुभाशीर्वाद दिले. व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद व सर्वांचे मनापासून आभार अशीच सेवा आपल्या हातून कायम घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे माजी उपसरपंच प्रमोद म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

