पिंपळीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा , महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात योगासने व जीवनशैलीवर मार्गदर्शन
![]()
पिंपळीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात योगासने व जीवनशैलीवर मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) –
पिंपळी, ता. अमळनेर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात या प्रसंगी सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक आदरणीय पी एस चव्हाण यांनी योगासने विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिकाद्वारे सादर केली. त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाने योगासने करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या समोर स्पष्ट झाले.
याच कार्यक्रमात संस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय डॉ जीवनलाल भिवसन जाधव यांनी विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्यासाठी व जीवनशैलीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्राणायामाचे प्रात्यक्षिक तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक दिनेश सावळे यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास शेलकर यांनी उपस्थित पाहुण्यांचा सन्मान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. योगाचा प्रसार व महत्व याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.




