रजनी बी.पाटील अंमळनेर अध्यक्ष::माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळ अंमळनेर. मुक्त छन्द लेखन प्रवास ग्रामीण ते अंतरराष्टीय,, स्वरचित कविता =आठवण शीर्षक=मायेचा झरा
![]()
रजनी बी.पाटील अंमळनेर
अध्यक्ष::माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळ अंमळनेर.
मुक्त छन्द
लेखन प्रवास ग्रामीण ते अंतरराष्टीय,,
स्वरचितकविता =आठवण
शीर्षक=मायेचा झरा
माय असता आनंदी माहेर,,
बाप असे तोपर्यंत हेरजार,,
भाऊ भावजाई बोलवती,,
माहेरची वाट लागे निराधार,,
जगात सुंदर स्त्री म्हणजे आई,,
अन जगातला श्रीमंत माणूस म्हणजे बाप,,
आई असे करुणेचा सागर,,
बाप तसा संस्काराचा आधार वड,,
प्रत्येक गाती आईची महती,,
बाप असता नसे कसलीच भीती,,
बाप गेला त्याची जागा झाली रीती,,
दोघे मिळूनी लेकरांच हित शोधती,,
असो सुख दुःखाचा डोंगर,,
आशीर्वादाने हलका वाटतोया भार,,
ऊबदार असा तो मायेचा पदर,,
तयावरी बाप मखमली रेशीम झालर,,
बाप कोसळणारा धबधबा,,
आईची माया संत संत धारा,,
बाप खळखळ समुद्र लाटा,,
आई समुद्रच्या त्या किनारा,,
विठूरखमई दोघे शोभे मंदिरी,,
आई माझी वात्सल मूर्ती,,
बाप असे सोनेरी कळस,,
मायबाप प्रेम निर्मळनिर्मळ,,
रजनी बी. पाटील
अंमळनेर.मो. 9665753714

