महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव येथे योगा दिनाचा आनंददायी उत्सव
![]()
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव येथे योगा दिनाचा आनंददायी उत्सव
अमळनेर प्रतिनिधी
21 जून 2025 रोजी महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेतील स्काऊट शिक्षक एच.ओ माळी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे विविध आसने प्रात्यक्षिकाद्वारे समजावून दिली व योगाचे महत्त्व सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय आर महाजन व एस के महाजन यांनीही योगासनांचा आनंद घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. तसेच शिक्षकेतर कर्मचारी देवेश पाटील, संभाजीराव पाटील व गुरुदास पाटील उपस्थित होते.
योगा दिनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती तसेच मानसिक शांती साध्य करण्याचा संदेश पोहोचवण्यात यश मिळाले. शाळेतील या प्रयत्नांनी योगाची महती व नियमित सरावाचे फायदे याबाबत जनजागृती केली आहे.






