10 वी आणि 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्याचा भालेराव नगर, पाटीलगढी मित्र परिवारातर्फे गुणगौरव*
1 min read

10 वी आणि 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्याचा भालेराव नगर, पाटीलगढी मित्र परिवारातर्फे गुणगौरव*

Loading

*10 वी आणि 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्याचा भालेराव नगर, पाटीलगढी मित्र परिवारातर्फे गुणगौरव*

अमळनेर शहरातील भालेराव नगर,पाटीलगढी मित्र परिवारातर्फे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 19 गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांना दरवर्षाप्रमाणे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप बापू पाटील, जवखेडा यांना लोकनायक पुरस्कार मिळाल्या बद्दल आणि माजी केंद्र प्रमुख गोकुळ आबा पाटील यांची साने गुरुजी विद्या मंदिर मध्ये तज्ञशिक्षण संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.असा त्रिवेणी गौरव समारंभ नुकताच मुंदडा अपार्टमेंट भालेराव नगर येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक श्रीराम नाना पाटील हे होते तर व्यासपीठावर माजी मुख्याध्यापक विलास पाटील, व्ही. ए. पाटील, हरिश्चन्द्र कढरे, रामलाल पाटील आणि गंगाधर अहिरराव ही जेष्ठ मंडळी होती.
यावेळी आदित्य लक्ष्मण पाटील, मोहन गणेश पाटील, प्रिया शरद चौधरी या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त करत या कार्यक्रमातून आम्हाला निश्चितच प्रेरणा मिळाली असून आमचा उत्साह द्विगुणित झाला असून कायम स्मरणात राहील असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
तसेच पालक म्हणून लक्ष्मण पाटील सर यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना अपयश आले म्हणून खचून न जाता सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास तसेच परिस्थिची जाणीव असल्यास यश हमखास प्राप्त करता येते असे सांगितले.
यावेळी संदीप बापू पाटील आणि अंकुश बाविस्कर सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
श्रीराम नाना पाटील विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखून आपल्या अभ्यासाची पद्धत बदलली पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता कमीत कमी वापर केला पाहिजे. स्वतःचे आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे अध्यक्षीय भाषण करताना सांगितले.
या सोहळ्यात कॉलनीतील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजय पाटील सर यांनी केले तर आभार रामकृष्ण पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऍड. दिनेश पाटील, अनिल दुसाणे,महेंद्र काटे,रविकांत पाटील, इंजि.उज्वल पाटील, किशोर पाटील,भूषण भांडारकर यांच्यासह भालेराव नगर, पाटीलगढी मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *