निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधून आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त सामाजिक संदेश — कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांचे प्रेरणादायी फलक लेखन
1 min read

निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधून आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त सामाजिक संदेश — कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांचे प्रेरणादायी फलक लेखन

Loading

निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधून आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त सामाजिक संदेश — कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांचे प्रेरणादायी फलक लेखन

पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधत शाळेच्या दर्शनी फलकावर एक सुंदर व प्रेरणादायी फलक लेखन तयार केले आहे. या फलकाद्वारे त्यांनी प्रत्येकाला योगाभ्यास करण्याचा संदेश दिला असून, यामुळे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य सुदृढ होण्यावर भर दिला आहे.
शिवाय, शैलेश कुलकर्णी म्हणतात की, फलक लेखन केवळ विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी नाही तर त्यातून सामाजिक सलोखा वाढावा आणि जनजागृती व्हावी या उद्देशानेही केले जाते. निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विविध सण, उत्सव व सामाजिक विषयांवर फलक लेखन करतांना या संदेशांना स्थान मिळते.
सध्या शैलेश कुलकर्णी यांचे सामाजिक संदेश देणारे फलक लेखन पाचोरा शहरात आणि समाजात चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह संपूर्ण समाजाला शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूक करण्याचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *