अमळनेरचे समाधान मैराळे यांना दिल्लीमध्ये मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान
1 min read

अमळनेरचे समाधान मैराळे यांना दिल्लीमध्ये मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान

Loading

अमळनेरचे समाधान मैराळे यांना दिल्लीमध्ये मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील लोकतंत्र न्यूज चे
पत्रकार समाधान एकनाथ मैराळे यांना शनिवारी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. मॅजिक आणि आर्ट विद्यापीठ हरियाणा या विद्यापीठाकडून ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.
यासाठी गेल्या महिन्यात विद्यापीठाकडून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून मानद डॉक्टरेट पदवीसाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार पात्रतेत बसणाऱ्या विविध राज्यातील लोकांची निवड झाली होती तर त्यातून महाराष्ट्रातील दोघांचा समावेश होता. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील समाधान एकनाथ मैराळे यांचीही निवड झाली होती. निवड झाल्यानंतर दिनांक 14 जून रोजी दिल्ली येथे संपूर्ण भारतातील सुमारे 38 जणांना मानद डॉक्टरेड पदवीने सन्मानित करण्यात आले. ही पदवी सुप्रीम कोर्टाचे वकील डॉ राम अवतार शर्मा, दिल्ली पोलिसातील पोलीस अधिकारी किरण सेठी आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आली. दरम्यान समाधान मैराळे यांना मिळालेल्या मानद डॉक्टरेट पदवी बद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *