पोलिसांची शाळेत अनपेक्षित हजेरी; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य, परिसरात उत्साहाचे वातावरण!  जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांची भावनिक भेट; खेळ, गप्पा आणि पुस्तकवाटपाने भरला आनंद
1 min read

पोलिसांची शाळेत अनपेक्षित हजेरी; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य, परिसरात उत्साहाचे वातावरण! जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांची भावनिक भेट; खेळ, गप्पा आणि पुस्तकवाटपाने भरला आनंद

Loading

पोलिसांची शाळेत अनपेक्षित हजेरी; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य, परिसरात उत्साहाचे वातावरण!

जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांची भावनिक भेट; खेळ, गप्पा आणि पुस्तकवाटपाने भरला आनंद

 

 

 

 

 

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
वाढोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने अचानकपणे शाळेला भेट दिली. या अनोख्या आणि मनमोकळ्या भेटीमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांनाच ही भेट अविस्मरणीय ठरली.
पोलिस अधिकारी शाळेत पोहोचताच त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. गप्पा, खेळ, आणि विनोद यांनी वातावरणात जिवंतपणा आला. काही मुलांच्या डोक्यावर स्वतःची टोपी ठेवून पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना विशेष आनंद दिला. उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांच्या टोपीचा आनंद तर विद्यार्थ्यांनी अक्षरशः लुटला.

 

 

यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत झाले. गणवेश व पुस्तकांचे वाटप पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमात त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, विस्तार अधिकारी विजय पगार, स्थानिक सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांनी शाळेतील विविध उपक्रमांचे निरीक्षण करून शिक्षकांचे कौतुक केले. ते म्हणाले, “मातृभाषेतून शिक्षण घेतलेली मुले समाजाला सक्षम बनवतात. जिल्हा परिषद शाळा ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उत्तम उदाहरण आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे शिक्षक आणि व्यवस्थापनाने सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानले आणि अशा सकारात्मक उपक्रमांची पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या भेटीमुळे शाळा आणि पोलिस यांच्यातील नातं अधिक घट्ट झाले असून, समाजातही याचे सकारात्मक पडसाद उमटत आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *