मातृ-पितृ आचार्य स्मृती जागरण सेवाभावी संस्थेच्या वतीने  निवृत्त सनदी अधिकारी अ.ध. वसावे यांना  जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करणार
1 min read

मातृ-पितृ आचार्य स्मृती जागरण सेवाभावी संस्थेच्या वतीने निवृत्त सनदी अधिकारी अ.ध. वसावे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करणार

Loading

मातृ-पितृ आचार्य स्मृती जागरण सेवाभावी संस्थेच्या वतीने निवृत्त सनदी अधिकारी अ.ध. वसावे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करणार

नंदुरबार- साक्री तालुक्यातील मातृपितृ आचार्य स्मृती जागरण सेवाभावी स्वयंसेवी संस्था कावठेच्या वतीने सेवानिवृत्त सनदी अधिकारी अ.ध. वसावे साहेब (आय.ए.एस.) यांच्या शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य बी.एस.दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली क.ब.चौ. उमवि जळगावचे प्रथम कुलगुरु डॉ. एन. के. ठाकरे, चौथे कुलगुरु डॉ. के.बी. पाटील, विद्यमान कुलगुरु डॉ. व्ही.एन. माहेश्वरी, प्रथम व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य एम.एल. नानकर, पू. साने गुरुजी महाविद्यालय, शहादा येथील निवृत्त प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा’ संपन्न होणार आहे. मंगळवार दि. 17 जून रोजी सकाळी 11 वाजता एकलव्य प्रशिक्षण केंद्र तळोदा रोड, नंदुरबार येथे उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. रत्नमाला बाबुराव पाटील व कार्यकारी संचालक मंडळ मातृ-पितृ आचार्य स्मृती जागरण सेवाभावी संस्था कावठे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *