ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यासाठी बैठक संपन्न.  *मुंबई विभाग शिक्षण उपसंचालकांनी वरील तीन जिल्ह्यातील शिक्षकांचा समस्या तातडीने सोडवाव्यात-शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे.*
1 min read

ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यासाठी बैठक संपन्न. *मुंबई विभाग शिक्षण उपसंचालकांनी वरील तीन जिल्ह्यातील शिक्षकांचा समस्या तातडीने सोडवाव्यात-शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे.*

Loading

ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यासाठी बैठक संपन्न.

*मुंबई विभाग शिक्षण उपसंचालकांनी वरील तीन जिल्ह्यातील शिक्षकांचा समस्या तातडीने सोडवाव्यात::शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे.*

ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याकरिता कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई येथे बैठक संपन्न झाली.*
दिनांक 11.06.2025 रोजी ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक समस्या शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई येथे प्रलंबित होत्या या समस्या सोडवण्याकरिता कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे साहेब व सहायक शिक्षण संचालक सुनील सावंत साहेब आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या विविध शैक्षणिक समस्या मांडल्या आणि त्या सोडवण्याकरिता तात्काळ कारवाई करावी असे निर्देशित केले.
यामध्ये ठाणे जिल्ह्यातील
1) देविदास मधुकर सुरोशे शाळा विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिवले तालुका मुरबाड जिल्हा ठाणे अनुकंपा नियुक्त लिपिक यांना शालार्थ प्रणाली मध्ये नाव समाविष्ट करून देण्यात आले.
2) नवनीत पाटील अनुकंपा नियुक्त छत्रपती शिवाजी हायस्कूल व दि बा पाटील जुनिअर कॉलेज जासई तालुका उरण जिल्हा रायगड यांचे देखील शालार्थ प्रणाली मध्ये नाव समाविष्ट करण्यात आले.
3) मृणालिनी रंगराव कांबळे अनुकंपा नियुक्त कनिष्ठ लिपिक न्यू इंग्लिश स्कूल कोकबन जिल्हा रायगड यांचे देखील शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करून देण्यात आले.
4) सुमित वर्धराज हेरकर सरस्वती विद्यालय चेंबूर मुंबई यांचे देखील शालार्थ प्रणाली मध्ये नाव समाविष्ट करण्यात आले.
5) गायत्री विद्यालय अंबरनाथ जिल्हा ठाणे या शाळेस स्थलांतरणाकरिता शिफारस देण्यात आली.
6) नंदा प्रशांत पाटील प्रतिमा हायस्कूल तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे यांचे देखील शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करून देण्यात आले.
अशाप्रकारे अनेक कामे मार्गी लागलेली असून उर्वरित प्रलंबित कामे देखील लवकरात लवकर सोडविले जातील असे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी आश्वासित केले.
शिक्षकांचे आमदार शिक्षक असल्यामुळे अनेक शिक्षकांच्या समस्या कमी वेळेमध्ये अगदी तात्काळ सोडविल्या जात असल्याने शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद होता, वरील दिलेल्या सर्व मान्यता ह्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती असल्याने खऱ्या अर्थाने ज्यांच्या कुटुंबातील करता कमावता व्यक्ती गेलेली होती अशा कुटुंबला न्याय देण्याचे काम व वारसांना नोकरी उपलब्ध करून त्यांना मान्यता देण्याचे व त्यांचे पगार सुरू करण्याचे पवित्र कार्य आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे करत आहेत आणि तेच खरे अनुकंपाचे व शिक्षकांचे कैवारी आहेत हे सिद्ध होत आहे. अशी माहिती
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष प्रशांत भामरे यांच्याकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *