शिरसोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे पत्र पालकांना वितरीत*, जि प शाळांच्या पटसंख्या वाढीसाठी अभिनव उपक्रम
1 min read

शिरसोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे पत्र पालकांना वितरीत*, जि प शाळांच्या पटसंख्या वाढीसाठी अभिनव उपक्रम

Loading

*शिरसोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे पत्र पालकांना वितरीत*
जि प शाळांच्या पटसंख्या वाढीसाठी अभिनव उपक्रम

जळगाव-जिल्हा परिषद शाळांच्या पट संख्या वाढी साठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे पालकांसाठी आवाहन पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर पत्र सर्व पालकांना देण्याची सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक सचिन परदेशी यांनी केली आहे. या नावीन्यपूर्ण व अभिनव उपक्रम अंतर्गत शिरसोली येथे शिक्षण विस्तार अधिकारी विजय शांतीलाल पवार यांच्या हस्ते पालकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे पत्र देत शाळा प्रवेशाचे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी केंद्र प्रमुख सुशील पवार, मुख्याध्यापिका मेघा परदेशी, उप शिक्षक चंदू बंजारा यांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिरात शिक्षण विभागा द्वारे स्टॉल लावण्यात आला होता. सदर माध्यमातून पालकांची जनजागृती करण्यात आल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *