साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त अमळनेर ग्रंथालयात भव्य प्रतिमापूजन व माल्यार्पण कार्यक्रम
1 min read

साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त अमळनेर ग्रंथालयात भव्य प्रतिमापूजन व माल्यार्पण कार्यक्रम

Loading

साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त अमळनेर ग्रंथालयात भव्य प्रतिमापूजन व माल्यार्पण कार्यक्रम

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात ११ जून रोजी साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त सन्मानसाठी प्रतिमापूजन व माल्यार्पण कार्यक्रम यशस्वीपणे आयोजना करण्यात आला. या कार्यक्रमात ग्रंथालयाचे ज्येष्ठ संचालक श्री. भिमराव जाधव यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले.
कार्यक्रमात वाचनालयाचे संचालक श्री. प्रसाद जोशी आणि कर्मचारी श्री. मधुकर बाळापुरे याशिवाय वाचकवर्गाने उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. प्रसाद जोशी यांनी केले.
या स्मृतिदिन साने गुरुजींच्या कार्याची आठवण करून देणारे आणि वाचन संस्कृती वाढीसाठी प्रेरणादायी ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *