अमळनेरमध्ये ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 FM’ च्या चाचणी प्रसारणास प्रारंभ — लवकरच औपचारिक उद्घाटन; आता जगभरात ऐकू येणारा अमळनेरचा आवाज
1 min read

अमळनेरमध्ये ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 FM’ च्या चाचणी प्रसारणास प्रारंभ — लवकरच औपचारिक उद्घाटन; आता जगभरात ऐकू येणारा अमळनेरचा आवाज

Loading

अमळनेरमध्ये ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 FM’ च्या चाचणी प्रसारणास प्रारंभ — लवकरच औपचारिक उद्घाटन; आता जगभरात ऐकू येणारा अमळनेरचा आवाज

अमळनेर प्रतिनिधी
: अमळनेरच्या इतिहासात एक नवे स्वर्णपान लिहिले जात आहे. मंगळ ग्रह सेवा संस्थान, अमळनेर यांना सूचना आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून रेडिओ प्रसारणाची अधिकृत मान्यता प्राप्त झाली असून ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 एफ.एम.’ या सामुदायिक रेडिओच्या चाचणी प्रसारणास नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच या रेडिओचे औपचारिक उद्घाटन होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले यांनी दिली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

या सामुदायिक रेडिओच्या माध्यमातून अमळनेर आणि परिसरातील स्थानिक लोकांसाठी शैक्षणिक, सामाजिक, कृषी, आरोग्यविषयक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मालिका प्रसारित होणार आहे. ग्रामीण भागातील जनजागृती, लोकसहभाग वाढविणे व नव्या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी हे माध्यम प्रभावी ठरणार आहे.

विशेष बाब म्हणजे रेडिओ मंगल ध्वनीचा आवाज आता केवळ अमळनेरपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो जगभरात ऐकला जात आहे. ‘रेडिओ मंगल ध्वनी’ या नावाचे स्वतंत्र अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून श्रोते कोणत्याही ठिकाणाहून या रेडिओचे थेट प्रसारण सहज ऐकू शकतात. याशिवाय ‘Radio Garden’ या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरसुद्धा ‘रेडिओ मंगल ध्वनी’ उपलब्ध असून जगभरातील कोट्यवधी श्रोत्यांपर्यंत अमळनेरचा आवाज पोहचत आहे. यामुळे अमळनेरच्या सांस्कृतिक वैभवाला आणि स्थानिक उपक्रमांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे.

अमळनेरच्या इतिहासात प्रथमच अशी एक शाश्वत माध्यम व्यवस्था उभी राहत असल्याने शहरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे. ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 एफ.एम.’ च्या माध्यमातून अमळनेरच्या सुप्त प्रतिभेला व स्थानिक गरजांना नवा आवाज मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *