विठ्ठल मंदिर धानवड येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर.
1 min read

विठ्ठल मंदिर धानवड येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर.

Loading

विठ्ठल मंदिर धानवड येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर.

दि. ११/०६/२५ रोजी,श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल च्या मार्फत धानवड गावातील विठ्ठल मंदिरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान धानवड गावातील ग्रामस्थांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभो घेतला.यावेळी होमिओपॅथी तज्ञ डॉ. अमिता श्रीवास्तव यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली तसेच नेत्र तपासणी नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे यांनी केली. या सर्व रुग्णांना मोफत होमिओपॅथी औषधी देण्यात आली तसेच मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच शिबिरात आलेल्या रुग्णांना डॉक्टरांनी मोफत मार्गदर्शन केले. रक्त तपासणी श्री. आकाश सोनवणे यांनी केली. कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष मा.श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. राहुल पाटील सर,प्राचार्य. डॉ.सुधांशू सिंग, रुग्णालय अधीक्षक श्री. डॉ.नरेंद्र शर्मा, यांच्या मार्गदर्शनाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

धानवड गावातील समाजसेवक मा. श्री.शिवराज रावसाहेब पाटील,उप-सरपंच श्री.हरिलाल पाटील यांचे सहकार्य लाभले.

तसेच प्रत्येक महिन्याला मोफत आरोग्य तपासणी करून देण्याचे आश्वासन श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज त्यांच्याकडून देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *