कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षणाचा अमूल्य वारसा आणि समाजासाठी त्यांची अधिदृष्टी**
![]()
**कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षणाचा अमूल्य वारसा आणि समाजासाठी त्यांची अधिदृष्टी**
आज मी पाया नसलेला जर पोटाची खळगी ज्ञानदान करून भरत असलो, तर ते केवळ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘कमवा-शिका’ या योजनेचा लाभ घेवूनच शक्य झाले आहे. जर ही योजना त्या काळात कर्मवीर भाऊरावांनी राबवली नसती, तर आज मी या दिव्यांगाच्या माथी भिक मागण्याच्या कटू परीस्थितीत असती.
सहावीपर्यंत शिक्षण गेलेले भाऊराव हे एक साधे पण तीव्र इच्छाशक्तीचे माणूस होते. त्यांनी कष्टाने शिक्षणाचा डोंगर उभा केला, ज्यामुळे गरीब दीन दुबळ्यांच्या भाग्यरेषा बदलल्या. हेच काम जगातील प्रगतीशास्त्रज्ञांनीही केले नसते. त्यांचे हट्टी पण जिद्दी व्यक्तिमत्त्व आणि झोपडपट्टीच्या दारात शिक्षण पोहोचवण्याचा त्यांचा महान प्रयत्न हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे.
भाऊरावांनी अनेक वस्तीगृहांची निर्मिती केली आणि स्वतःचा देह आणि मनधन दोन्ही खर्च करून देशासाठी कार्य केले. जे राष्ट्रपित्यांनीही शक्य केले नाही, ते या सर्वसामान्य माणसाने केले. त्यांच्या निर्मित वस्तीगृहांच्या व शालेय-कॉलेजांच्या नावात शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचा अभिमानास्पद समावेश आहे. आशियातील एक मोठी रयत शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली.
लोक म्हणतात की धन, धर्म, रक्त, नाती गोती श्रेष्ठ आहेत, पण भाऊरावांनी सूर्यप्रकाशासारखे सत्य स्थापन केले, जे कधीही बदलणार नाही. जसे सूर्य प्रकाश सर्वांना समान आणि निरपेक्ष उब देतो, तसे शिक्षण सर्वांसाठी समान उपलब्ध असावे. जात, धर्म, रक्त इतिहासातक नसले तरीही आपण शिक्षण घेणे आवश्यक आहे.
फालतु कार्यक्रम, डीजे-पुढे नाच आणि क्रिकेट यांसारखे व्यसन बंद करावे. घरातून दूर राहून वस्तीगृहांमध्ये रहाणाऱ्यांनी ‘कमवा-शिका’ योजनेचा आधार घेऊन स्वाभिमान, स्वातंत्र्य, समता आणि समविचार यांना प्रोत्साहन द्यावे. स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय वाढवली पाहिजे; हेच आपल्या महान कर्मवीर भाऊरावांचे ध्येय आहे.
मी स्वतः भाऊरावांच्या शिकवणींचे पालन करतो. एकट्याने जातांना मला वाटते की, भाऊरावांच्या पत्नी लक्ष्मी बाई यांनी आपल्या पतीला भारावून संसार सांभाळला असावा.
वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना संक्रांतिचे जेवण मिळावे म्हणून मंगळसूत्र गहाण लावणारी ती आई किती महान आहे!
आज एकटी शिक्षकीसाठीही अनुदान न मिळणाऱ्या शिक्षकांना साथ मिळत नाही, हे दुर्दैव आहे. शिक्षण केवळ स्वार्थाच्या साधनापासून अधिक काही नसावे का, असा विचार पडतो. शिक्षणाने मन, हृदय आणि मनगट यांचे बळ वाढणे आवश्यक आहे.
कर्मवीर भाऊरावांचे ते कर्म वारसदार होत असतांना आज अनेक नाममात्र पगारधारी शिक्षक एकटे पडले आहेत. त्यांना सलाम त्यांच्या जिद्दी आणि चिकाटीसाठी!
कर्मवीर भाऊरावांचा वारसा हा खरंच जीवंत राहावा आणि अपंग असतानाहीही यशस्वी होण्याच्या मार्गावर आम्हा सर्वाना प्रेरणा देत राहावा, ही सदिच्छा!
दुर्दैव असा की, ज्या सुशिक्षित मुलींसाठी निस्वार्थी शिक्षक ज्ञानदान करतात, त्यांना साथ मिळते नाही; केवळ स्वतः च्या वाईट स्वार्थासाठीच बघितले जाते
मा.प्रकाश पाटील
संचालक,
यशपंढरी इंग्रजी क्लास, अमळनेर


