अमळनेरमध्ये महाराणा प्रताप जयंती साजरी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले अभिवादन
![]()
अमळनेरमध्ये महाराणा प्रताप जयंती साजरी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले अभिवादन
अमळनेर प्रतिनिधी – महाराणा प्रताप हे 16व्या शतकातील मेवाडचे वीर राजा होते. ते आपल्या धैर्यशील आणि देशभक्त वृत्तींसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी मोगल सम्राट अकबर यांच्याविरुद्ध स्वराज्यासाठी लढा दिला आणि हळदीघाटीच्या युद्धात त्यांच्या पराक्रमाची जाणीव करून दिली. महाराणा प्रताप आपल्या लोकांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी झुंजत राहिले आणि त्यांना भारतीय इतिहासातील एक महान नेता मानले जातात.

भारतातील मेवाडचे तेरावे सर्वात महान राजामहाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्ताने 29 मे रोजी अमळनेरमध्ये उत्साहात आणि सत्कारासह कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. यासंदर्भात रेस्ट हाऊस समोर महाराणा प्रताप चौक येथे जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या वेळी समाजबांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करून करण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्साह व श्रद्धा व्यक्त केली.
जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई पाटील, रणजीत पाटील, भाजपाच्या शहराध्यक्ष विजय राजपूत, शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपूत, कळमसरेचे उपसरपंच पिंटू राजपूत, भगतसिंग पाटील, स्वर्णदिप राजपूत, विजय पवार, उमेश वाल्हे,मा. नगरसेवक विक्रांत पाटील, संजय पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश पाटील, राजु देशमुख, मुकेश परदेशी, केदार राजपूत, योगी राजपूत, मच्छिंद्र पाटील, समाधान पाटील, पत्रकार ईश्वर महाजन, डॉ. रामराव पाटील, विजय पाटील, संजय पाटील, विलास पाटील यांसह अनेक समाज बांधव उपस्थित होते.
समाजाचे पदाधिकारी म्हणाले की, या महान योद्ध्याच्या जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये 29 मे रोजी मोठ्या उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, ज्यात प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग असेल.


