विजयसिंह सिसोदिया व्यवसाय शिक्षण कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड
1 min read

विजयसिंह सिसोदिया व्यवसाय शिक्षण कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड

Loading

विजयसिंह सिसोदिया व्यवसाय शिक्षण कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड

अमळनेर प्रतिनिधी — प्राचार्य बापूसाहेब विजयसिंह सिसोदिया यांना त्रिरुपती एज्युकेशन सोसायटी, वाडीभोकर रोड, धुळे प्रस्तुत असून, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवसाय शिक्षण कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या आनंददायी प्रसंगी त्यांचा सत्कारही करण्यात आला.

सत्कार प्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ. व्ही. एस. पाटील, भैय्यासाहेब पाटील, श्री जितेंद्र पाटील, मुख्याध्यापक संघाचे माननीय अध्यक्ष व प्राचार्य प्रकाश पाटील सर, अविनाश पाटील, जवराज सर, गोमासे सर, बच्छाव सर, राजेंद्र पाटील आदी विख्यात मान्यवर उपस्थित होते.

बापूसाहेब सिसोदियांनी व्यवसाय शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची सगळी उपस्थित मंडळाने दखल घेतली असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *