पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन
1 min read

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन

Loading

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन

 

पुणे, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ): जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कुटुंबियांना धीर दिला.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्यासोबत उपस्थित असणाऱ्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी मृतांच्या कुटुंबियांनी पहलगाममध्ये घडलेल्या दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *