अमळनेर शहरात उदया कॅण्डल मार्चचे आयोजन — पहलगाम हल्ल्यातील शहीद नागरिकांना श्रद्धांजली व आतंकवादाचा निषेध*
1 min read

अमळनेर शहरात उदया कॅण्डल मार्चचे आयोजन — पहलगाम हल्ल्यातील शहीद नागरिकांना श्रद्धांजली व आतंकवादाचा निषेध*

Loading

*अमळनेर शहरात उदया कॅण्डल मार्चचे आयोजन — पहलगाम हल्ल्यातील शहीद नागरिकांना श्रद्धांजली व आतंकवादाचा निषेध*

अमळनेर प्रतिनिधी — पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील तमाम देशभक्त नागरिकांनी कॅण्डल मार्चचे आयोजन केले आहे. या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून दहशतवादाचा तीव्र निषेध करण्यासाठी हा मार्च आयोजित करण्यात आला आहे.

या कॅण्डल मार्चसाठी सर्व धर्मीय अमळनेरकर नागरिक बंधू-भगिनींना उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे.
दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन परमपूज्य साने गुरुजींच्या पुतळ्याजवळ समारोप होणार आहे.

दहशतवादाचा निषेध व शांततेचा संदेश देण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *