मा.विलासरावजी पाटील कार्य गौरव कार्यक्रमाची तारीख बदलली; नवीन तारीख 11 मे 2025
1 min read

मा.विलासरावजी पाटील कार्य गौरव कार्यक्रमाची तारीख बदलली; नवीन तारीख 11 मे 2025

Loading

श्री विलासरावजी पाटील कार्य गौरव कार्यक्रमाची तारीख बदलली; नवीन तारीख 11 मे 2025

धुळे प्रतिनिधी- अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ओबीसी शिक्षक असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष तथा महात्मा फुले हायस्कूल देवगाव चे अध्यक्ष विलासराव पाटील यांच्या कार्यगौरव कार्यक्रमाबद्दल
सर्व सन्माननीय सदस्य व मित्रपरिवार यांना महत्त्वाची सूचना देण्यात येते की, श्री विलासरावजी पाटील यांच्या कार्य गौरवाचा कार्यक्रम, जो सुरूवातीला 3 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता, तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. या बदलानुसार, कार्यक्रमाची नवीन तारीख 11 मे 2025 ठरविली असून तो सकाळी 10:00 वाजता हिरे भवन येथे आयोजित करण्यात येणार आहे.

सर्व सन्माननीय सदस्यांनी या बदलाची नोंद घेतली पाहिजे, तसेच जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, अशी प्रा. डॉ. संभाजी पाटील, सरचिटणीस, श्री विलासरावजी पाटील कार्य गौरव समिती यांनी नम्र विनंती केली आहे.

आपल्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक स्फूर्ती येईल. सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *