अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १६ दिवसांऐवजी एक महिना उन्हाळी सुट्टी द्यावी -रामकृष्ण पाटील
1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १६ दिवसांऐवजी एक महिना उन्हाळी सुट्टी द्यावी -रामकृष्ण पाटील

Loading

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १६ दिवसांऐवजी एक महिना उन्हाळी सुट्टी द्यावी -रामकृष्ण पाटील

अमळनेर प्रतिनिधी
राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांना एक महिना उन्हाळी सुट्टी द्यावी. या मागणीसाठी आपला पाठपुरावा सुरू आहे.असे असताना जळगांव जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टीबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. हेमंतराव भदाणे यांनी दि.२४.०४.२०२५ रोजीच्या पत्रानुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना आदेशित केले आहे.
सदर पत्रानुसार सेविकांना दि.१ मे २०२५ ते दि.१६ मे २०२५ पर्यंत तसेच मदतनिसांना दि.१७ मे २०२५ ते दि.१ ते २०२५ पर्यंत उन्हाळी सुट्टी देण्याबाबत नमुद केले आहे. उन्हाळी सुट्टी आळीपाळीने १६-१६ दिवस न देता सेविका मदतनिसांना महिनाभर सोबत उन्हाळी सुट्टी द्यावी.अशी मागणी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी शासन स्तरावर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *