फार्मसी महाविद्यालयात GPAT सराव परीक्षेचे आयोजन*
1 min read

फार्मसी महाविद्यालयात GPAT सराव परीक्षेचे आयोजन*

Loading

*फार्मसी महाविद्यालयात GPAT सराव परीक्षेचे आयोजन*

खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात GDC Classes यांच्या संयुक्त विद्यमाने GPAT online पध्दतीने सराव परीक्षा आयोजित करण्यात आली.या परीक्षेत विद्यार्थ्यांकडून नमुना प्रश्नपत्रिकेचा सराव करण्यात आला.यामध्ये परीक्षा पद्धत, प्रश्न प्रकार आणि वेळेची मर्यादा यांसारख्या बाबी वास्तविक परीक्षेप्रमाणेच घेण्यात आल्या ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी व्यवस्थित करता येईल. सदर कार्यक्रमाचे उत्तम सादरीकरण प्रा.देवेश प्र. भावसार यांनी केले.

पदवी अभ्यासक्रमातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ.संदेश बी. गुजराथी फार्मसी विभागाचे चेअरमन मा.योगेशजी मुंदडे,खा.शि.मंडळाचे चिटणीस प्रा.पराग पी. पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र सोनवणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *