अमळनेरमध्ये पाणपोईचा उद्घाटन सोहळा; हॉटेल संजयच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे उदाहरण!
1 min read

अमळनेरमध्ये पाणपोईचा उद्घाटन सोहळा; हॉटेल संजयच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे उदाहरण!

Loading

अमळनेरमध्ये पाणपोईचा उद्घाटन सोहळा; हॉटेल संजयच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे उदाहरण!

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील बस स्थानकाजवळील हॉटेल संजय बिअर बारचे मालक, स्व. बाबासो संजय चौधरी यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त आज दुपारी पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले. त्यांचे चिरंजीव हॉटेल संजयचे संचालक पवनभाऊ चौधरी आणि नंदु चौधरी हे सलग अकरा वर्षांपासून या समाजोपयोगी उपक्रमात सक्रिय आहेत.
उन्हाळ्यात पादचारी आणि प्रवाशांसाठी पाणपोईचा लाभ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. या उपक्रमामुळे अनेक लोकांना ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळाला आहे. समोरच बस स्थानक असल्यामुळे बस स्थानकावर पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांनाही त्याचा फायदा होईल..
उद्घाटनप्रसंगी मित्र परिवार आणि विविध मान्यवरांचा समावेश होता, ज्यात हॉटेल संजयचे संचालक तेली युवा समितीचे अध्यक्ष पवन संजय चौधरी, नंदु चौधरी, गिरीश चौधरी, शशिकांत आढावे, पारधी सर, नाना पाटील, दत्तू लांडगे, अनिल चौधरी, नाना राऊळ आणि किसन पाटील उपस्थित होते.
या उपक्रमामुळे स्थानिक समुदायाच्या एका जिवंततेचा संचार झाला असून, सामाजिक एकतेच्या या उदाहरणाने सर्वांना प्रेरित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *