फार्मसी महाविद्यालयात SOP WRITING स्पर्धेचे आयोजन*
![]()
*फार्मसी महाविद्यालयात SOP WRITING स्पर्धेचे आयोजन*
अमळनेर प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात PHARMACEUTICS विभागातर्फे द्वितीय वर्ष पदवी औषधनिर्माणशास्त्र विद्यार्थ्यांकरिता “SOP WRITING” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. PHARMACEUTICS विभागप्रमुख प्रा.देवेश पी.भावसार यांच्या संकल्पनेतून विभागातील विविध उपकरणां विषयीची तांत्रिक व उपयुक्ततेबाबतची माहिती विद्यार्थ्यांकडून स्पर्धात्मक स्वरूपात संकलित करण्यात आली. यात सुमारे ५४ विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांचा गट अशा स्वरूपात सहभाग नोंदविला. संकलित केलेल्या SOP चे विविध मुद्दय़ांच्या आधारे परिक्षण प्रा.सौ.वर्षा पाटील यांनी परिक्षक म्हणून केले. प्रथम क्रमांक कु.तन्वी पाटील व कु.वैष्णवी जेठवा द्वितीय क्रमांक कु. हर्षदा भोई व कु.वैष्णवी पाटील आणि तृतीय क्रमांक कु.शिवानी परदेशी यांनी सादर केलेल्या SOP ना मिळाला.
सदर विजयी विद्यार्थ्यांचा गुणगौरव खा.शि.मंडळाचे चिटणीस सन्माननीय प्रा.पराग पाटील यांच्या हस्ते व फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र स. सोनवणे यांच्या उपस्थितीत रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
विद्यार्थ्यांचे तांत्रिक विषयांतील ज्ञान अद्ययावत होण्याकरिता अशाप्रकारचे उपक्रम खूप उपयुक्त असतात आणि त्यात सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रा.पराग पाटील यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना सांगितले. सदरच्या स्पर्धा कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यासाठी प्रा.देवेश भावसार यांनी परिश्रम घेतले. बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमास प्रा.रविन्द्र माळी, प्रा.प्रितम पाटील, प्रा. वर्षा पाटील, प्रा.छाया महाजन, प्रा.सतिश ब्राम्हणे, प्रा. प्रगती पाटील, प्रा. हर्षदा पवार, प्रा. शिवानी शर्मा, प्रा. मानसी उपासनी, प्रा. वैशाली कुळकर्णी व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व विजयी व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ.संदेश बी. गुजराथी फार्मसी विभागाचे चेअरमन मा.योगेशजी मुंदडे प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन यांनी केले आहे.

