अमळनेरमध्ये सरपंच आरक्षण सोडतीसाठी महत्त्वाची बैठक; सर्व नागरिकांची उपस्थिती आवश्यक!
1 min read

अमळनेरमध्ये सरपंच आरक्षण सोडतीसाठी महत्त्वाची बैठक; सर्व नागरिकांची उपस्थिती आवश्यक!

Loading

अमळनेरमध्ये सरपंच आरक्षण सोडतीसाठी महत्त्वाची बैठक; सर्व नागरिकांची उपस्थिती आवश्यक!

अमळनेर प्रतिनिधी
जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कडील क्रमांक साशा ग्रामप/कावि//2025च्या अधिसुचनेनुसार, अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींतील सर्व नागरीक आणि राजकीय पदाधिकारी यांना महत्त्वाची जाहीर विनंती करण्यात आली आहे. अमळनेर तालुक्यात एकूण 119 ग्रामपंचायती आहेत, ज्यामध्ये अनुसूचीत जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग यांच्या प्रतिनिधित्वासाठी ग्रामपंचायत निहाय सरपंच आरक्षण निश्चित करणे अपेक्षित आहे.
यासंदर्भात, महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांच्या मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील) आरक्षण राखून ठेवण्यासाठी आरक्षण सोडत दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी इंदिरा गांधी भवन, स्टेट बँकेच्या मागे, अमळनेर येथे दुपारी 3.30 वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी सर्व संबंधितांना आवाहन केले आहे की, या आरक्षण सोडतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. या बैठकीद्वारे स्थानिक समाजातील विविधतेचा आदर केला जाईल आणि योग्य प्रकारे प्रतिनिधित्व सुनिश्चित केले जाईल. सर्व नागरिक, सरपंच आणि ग्रामपंचायतीसदस्यांचे सहकार्य अपेक्षित आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *