कळमसरे येथील सेवानिवृत्त शिक्षक जी .टी महाजन यांचे दुःखद निधन
1 min read

कळमसरे येथील सेवानिवृत्त शिक्षक जी .टी महाजन यांचे दुःखद निधन

Loading

कळमसरे येथील सेवानिवृत्त शिक्षक जी .टी महाजन यांचे दुःखद निधन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
कळमसरे ता. अमळनेर येथील लौकिकशाली सेवानिवृत्त शिक्षक श्री. गुलाब तोताराम महाजन (वय ७६) यांचे आज ता. १८ रोजी १० वाजता दुःखद निधन झाले.
ज्येष्ठ शिक्षक जी.टी. महाजन यांनी धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे उपशिक्षक म्हणून काम केले. त्यांच्या शिस्तप्रिय शिक्षणपद्धतीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात अल्पावधीत यश मिळवले. त्यांनी आपल्या कुटुंबावर तसेच समाजावर योग्य संस्कारांची शिकवण दिली, ज्याचा परिणाम त्यांच्या विद्यार्थ्यांच्या यशावर स्पष्टपणे दिसून येतो.मितभाषी होते..
त्यांच्या निधनामुळे कळमसरे परिसरात व सामाजिक समुदायामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कै.जी.टी महाजन यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली,जावाई,सुन, नातवंडे, तसेच एक भाऊ आहे. ते कळमसरे येथील प्रसिद्ध शैक्षणिक व्यक्तिमत्त्व आणि समाजसेवक डॉ. मोतीलाल महाजन यांचे भाऊ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *