प्रताप’ चे ई-वेस्ट व्यवस्थापनावर पथनाट्य सादर*
1 min read

प्रताप’ चे ई-वेस्ट व्यवस्थापनावर पथनाट्य सादर*

Loading

*’प्रताप’ चे ई-वेस्ट व्यवस्थापनावर पथनाट्य सादर*
———————————————
● इलेक्ट्रॉनिक विभागाचा स्तुत्य उपक्रम
● रेल्वे स्टेशन, बस स्थानकावर
जनजागृती
● ई-वेस्ट व्यवस्थापन आणि पर्यावरण
सरंक्षण यावर मार्गदर्शन
————————————————-
अमळनेर : १५ मार्च २०२५ ,: प्रताप महविद्यालयाच्या इलेक्ट्रोनिक द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यानी रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर “ई- वेस्ट (इलेक्ट्रोनिक –कचरा) नाही वेस्ट” हे प्रभावी पथनाट्य सादर करून ई-वेस्टच्या योग्य निवरणाचे महत्व लोकांपर्यंत पोहचविले. “ई-वेस्टचे योग्य व्यवस्थापन म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण.” या मुख्य संदेशावर आधारित विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर नाटक सादर केले. या नाटकात, विविध दृष्य द्वारे विद्यार्थ्यानी ई –वेस्ट खूप घातक असू शकतात आणि त्यांना योग्य प्रकारे रिसायकल किंवा निवारण करणे आवश्यक आहे हे पटवून दिले. नाटकात विद्यार्थ्यांनी रीसायकलिंग, पुनर्वापर, आणि ई-वेस्टच्या योग्य निवारणावर जनमाणसांचे लक्ष केंद्रित केले. स्थानकांवर प्रवासी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांचा संदेश स्वीकारला. नाटकाच्या शेवटी, सर्वांनी एकत्र येऊन “ई-वेस्ट व्यवस्थापन करा, पर्यावरण वाचवा!” या घोषणेसोबत ई-वेस्टच्या योग्य निवारणाची शपथ घेतली.
या मोहिमेचे आयोजन महाविद्यालायचे माननीय प्राचार्य डॉ.ए.बी.जैन यांचा परवानगीने आणि विभागाचे प्राध्यापक डॉ.मुकेश भोळे, प्रा.वृषाली वाकडे, प्रा. वैष्णवी पाटील, प्रा.अमोल अहिरे, प्रा. कल्याणी पाटील यांचा मार्गदर्शनाखाली करणायात आले होते आणि त्यास रेल्वे स्थानक व्यवस्थापक श्री.अनिल बी. पाटील व इतर अधिकारी तसेच बस स्थानक व्यवस्थापक श्री.चौधरी यांनी देखील या जागरूकता मोहिमेला समर्थन दिले आणि ई-वेस्टवर आधारीत नाटक सादर करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *