“महाशिवरात्री उत्सव 2025: झाडी पंचक्रोशीतील शिवभक्तांसाठी अद्वितीय अनुभवाची संधी!”
1 min read

“महाशिवरात्री उत्सव 2025: झाडी पंचक्रोशीतील शिवभक्तांसाठी अद्वितीय अनुभवाची संधी!”

Loading

“महाशिवरात्री उत्सव 2025: झाडी पंचक्रोशीतील शिवभक्तांसाठी अद्वितीय अनुभवाची संधी!”

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त, दिनांक 26 फेब्रुवारी 2025 बुधवार रोजी झाडी पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांना श्री ममलेश्वर महादेवांचा दर्शनाचा लाभ घेण्यासाठी विशेष निमंत्रण आहे. यात्रेत विविध प्रकारच्या दुकाने, हॉटेल्स, पालखी, झुले आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध असणार आहेत, ज्यामुळे हा उत्सव अधिक रंगीन होईल.
यात्रेचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे असतील:

– 25 फेब्रुवारी 2025 (मंगळवार):
गावातील व परिसरातील महिलांसाठी भव्य जल कलश यात्रा आणि आनंद उत्सव मेळावा आयोजित करण्यात येईल, ज्यामध्ये रांगोळी स्पर्धा देखील असेल.

– 26 फेब्रुवारी 2025 (बुधवार):
सकाळी आठ वाजता भव्य ध्वज मिरवणूक होळी चौकातून निघेल. डीजेच्या तालावर रंगतलेली ही मिरवणूक देव बल्ली परिसरात येईल व ममलेश्वर महादेव मंदिरावर ध्वज लावण्यात येईल. ध्वज लावल्यावर, महादेव मंदिरावर अभिषेक करण्यात येईल.
तसंच, मंदिर परिसरात प्रसिद्ध पंकजजी रवींद्र दुसाने (पी. एन. ज्वेलर्स झाडीकर सराफ) यांचे स्पार्क फाउंडेशन “शिवकालीन शस्त्र प्रदर्शन” दिनांक 26 फेब्रुवारी 2025 ते 27 फेब्रुवारी 2025 या काळात सुरू राहील.

26 फेब्रुवारी 2025 (बुधवार):
संध्याकाळी आठ वाजता खान्देशातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रविकिरण महाराज दोंडाईचांकर यांचे जाहीर कीर्तन होणार आहे. सर्व शिवभक्त व रसिकांची उपस्थिती महत्वाची आहे.
27 फेब्रुवारी 2025 (गुरुवार):
संध्याकाळी आठ वाजता गावातील आजी-माजी फौजी यांना वीर गौरव पुरस्कार ममलेश्वर महादेव संस्थान तर्फे प्रदान केला जाणार आहे.
यात्रेत सहभागी होऊन देवदर्शन, प्रदर्शन, कीर्तन आणि अनेक मनोरंजक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थिति नोंदवावी. झाडी ग्रामस्थांकडून सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की, या पावन महाशिवरात्री यात्रोत्सवाला उपस्थित राहून मदतीचा हात देऊन साजरा करावा.
आपल्या सर्वांचे सहकार्य आणि उपस्थिती यासाठी आग्रहाचे आमंत्रण!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *