प्रताप’ मध्ये भव्य सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न* ——————————————— ● शिवजयंती निमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन ● 197 विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग ● प्राचार्य डॉ.अरुण जैन,ऍड चंद्रभान पाटील,डॉ.जितेंद्र पाटील यांचे मिळाले सहकार्य
1 min read

प्रताप’ मध्ये भव्य सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न* ——————————————— ● शिवजयंती निमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन ● 197 विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग ● प्राचार्य डॉ.अरुण जैन,ऍड चंद्रभान पाटील,डॉ.जितेंद्र पाटील यांचे मिळाले सहकार्य

Loading

*’प्रताप’ मध्ये भव्य सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न*
———————————————
● शिवजयंती निमित्त स्पर्धा परीक्षेचे
आयोजन
● 197 विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे
सहभाग
● प्राचार्य डॉ.अरुण जैन,ऍड चंद्रभान
पाटील,डॉ.जितेंद्र पाटील यांचे मिळाले
सहकार्य
————————————————-
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज (स्वायत्त) मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त करिअर कौंसेलिंग सेंटर व शिखर अकॅडेमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य समान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता सीसीएमसी विभागात करण्यात आले.
ही स्पर्धा निःशुल्क होती,अमळनेर तालुक्यासह एरंडोल येथील विद्यार्थ्यांनी देखील स्पर्धेत सहभाग नोंदविले. स्पर्धेत अव्वल येण्या-या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
प्रस्तुत स्पर्धेच्या आयोजनात प्राचार्य डॉ.अरुण जैन,संस्थेचे सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव,ऍड.चंद्रभान पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

 

 

 

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय,अमळनेर या ठिकाणी करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करिअर कौन्सिलिंग सेंटर आणि शिखर अकॅडमी अमळनेर यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,या स्पर्धेत एकूण 197 विद्यार्थ्यांनी स्फूर्तपणे सक्रिय सहभाग घेतला.
याप्रसंगी करिअर कौंसेलिंग सेंटरचे डॉ.जितेंद्र पाटील,दिलीप शिरसाठ,पराग पाटील,डॉ.हर्ष नेतकर, प्रा.अमोल अहिरे, प्रा.हिमांशू गोसावी, अनिकेतन अहिरे,अतुल धनगर ,सागर कोळी आदींनी परिश्रम घेतले.
स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम,द्वितीय,तृतीय,उत्तेजनार्थ बक्षिसे विशेष समारंभात प्रदान केले जाणार आहेत
प्रस्तुत स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी खा.शी.मंडळाचे सर्व सन्मानीय पदाधिकारी, प्राचार्य डॉ.अरुण जैन, सर्व उपप्राचार्य, करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख, कुलसचिव, कार्यालयीन अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, विभाग प्रमुख, प्राध्यापक, करिअर कौंसेलिंग सेंटरचे सन्मानीय सदस्य यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *