*”बापूराव ठाकरे सरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिवशी प्रतिमा पूजनाचा मान”**
1 min read

*”बापूराव ठाकरे सरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिवशी प्रतिमा पूजनाचा मान”**

Loading

**”बापूराव ठाकरे सरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिवशी प्रतिमा पूजनाचा मान”**

अमळनेर प्रतिनिधी
उपक्रमशिल शिक्षक बापूराव ठाकरे हे सरप्लस म्हणून पूज्य साने गुरुजी आदर्श प्राथमिक शाळेमध्ये आल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व पूज्य साने गुरुजी पतपेढीचे पदाधिकारी संजीव पाटील सर यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत बापूराव ठाकरे सरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन करण्याचा सन्मान दिला.
या विशेष प्रसंगावर बापूराव ठाकरे सरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आज माझ्या जीवनातील अत्यंत आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण मला आमच्या सानेगुरुजी विद्यामंदिर, अमळनेर येथे स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती साजरी करतांना प्रतिमा पूजनाचा मान दिला. याबद्दल मला आदर्श मुख्याध्यापक श्री. संजीव पाटील सर आणि सर्व जेष्ठ व श्रेष्ठांचे मनापासून धन्यवाद आणि आभार.”
या कार्यक्रमामुळे शाळेत एकत्रितपणे माझ्या ऐतिहासिक वारसा आणि शिक्षणाच्या महत्वाबाबत चर्चा करण्यात एक विशेष महत्त्व निर्माण झाले आहे, असे बापूराव ठाकरे सरांचे म्हणणे आहे. यामुळे शाळेतून समाजातील युवकांना प्रेरित करून स्वतंत्र भारताच्या इतिहासाची जाणीव करून देण्यात मदत होईल.

यावेळी शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *