मध्यमवर्ग आणि महाराष्ट्राला दिलासा देणारा बजेट-आमदार अनिल पाटील
1 min read

मध्यमवर्ग आणि महाराष्ट्राला दिलासा देणारा बजेट-आमदार अनिल पाटील

Loading

मध्यमवर्ग आणि महाराष्ट्राला दिलासा देणारा बजेट-आमदार अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी
केंद्र शासनाने सादर केलेला बजेट मध्यमवर्ग, गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांसाठी दिलासा देणारा असून महाराष्ट्र राज्याला झुकते माप मिळाले आहे.मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारमण जी यांच्या मार्गदर्शनाखाली हे बजेट देशाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारे ठरेल. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.आयकरात ऐतिहासिक कपात झाल्याने मध्यमवर्गीयाना मोठा दिलासा आहे.12 लाख पर्यंत उत्पन्नावर कोणताही कर नसल्याने आणि 12.75 लाख पर्यंतच्या वेतनभोगी कर्मचाऱ्यांसाठी कोणताही कर नसल्याने या वर्गाला मोठा दिलासा आहे.शेती आणि ग्रामीण विकासासाठी विशेष योजना असल्याने शेतकरी वर्गाला विशेष लाभ होणार आहे.पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास यांचाही समावेश असल्याने या बजेट चे आम्ही स्वागत करतो. असे
आमदार अनिल भाईदास पाटील
मा.मंत्री- मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन यांनी बोलतांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *