इ.१०वी १२वी फेब्रु /मार्च-२०२५ बोर्ड परीक्षेच्या केंद्रसंचालक/पर्यवेक्षक आंतरबदलाचा निर्णय तात्काळ थांबवा जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ,जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना,जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदन
![]()
इ.१०वी १२वी फेब्रु /मार्च-२०२५ बोर्ड परीक्षेच्या केंद्रसंचालक/पर्यवेक्षक आंतरबदलाचा निर्णय तात्काळ थांबवा
जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ,जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना,जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदन
जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने येत्या फेब्रुवारी/मार्चमध्ये होणाऱ्या इ.१०वी व १२ वी परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत केंद्र संचालक,पर्यवेक्षक अदलाबदलीचा जो निर्णय घेतलेला त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे सर्वच शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना प्रशासकीय व शैक्षणिकदृष्ट्या अडचणीचे ठरणार असून एका शाळेतील केंद्रसंचालक, मुख्याध्यापक,उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या आस्थापनेवरील परीक्षेचे काम करता येणार नसून याउलट त्यांना दुसऱ्या शाळेच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या कामकाजासाठी नियुक्ती दिली जाईल. यामुळे शिक्षिकांना दूरच्या शाळेत पर्यावेक्षणासाठी जाणे काहीसे अडचणीचे ठरणार आहे. तसेच बोर्ड परीक्षेच्या दरम्यान इ.९वी,११वीचे वर्ग अध्यापन होणे अत्यावश्यक असल्याने ते या निर्णयामुळे शक्य होणार नाही. परीक्षा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची अशी अदलाबदल करून समस्त शिक्षक घटकांवर शासनाने जो अविश्वास दाखविला तो सर्वार्थाने योग्य नाही. परीक्षाकॉपीमुक्त होणेसाठी शिक्षक देखील शासनाच्या धोरणाला मदत करतील परंतु परीक्षेचे दिवस जवळ येत असतांनाच अशा आकस्मिक निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी प्रचंड धास्तावले असून परीक्षेचे दडपण विद्यार्थ्यांच्या मनावर येत आहे. परीक्षा कॉपीमुक्त होणेसाठी शिक्षक देखील शासनाच्या धोरणाला मदत करतील परंतु परीक्षेचे दिवस जवळ येत असतांनाच कॉपी निर्मूलनासाठी हा पर्याय स्विकारणे म्हणजे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या नात्यावर अविश्वास व्यक्त करणे आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्वच शिक्षक कटिबध्द असून सदरहू निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा. यासाठी आज जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ,जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना,जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने मा.शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदन देण्यात आले
याप्रसंगी सर्वश्री.एस.डी. भिरूड, जे.के.पाटील, गोपाळ पाटील, सुनील गरुड,तुषार बोरसे,डी.ए.पाटील,एन.ओ. चौधरी, पी.व्ही. वाणी, डॉ.अतुल इंगळे,प्रा.राहुल वराडे, प्रा.स्वप्नील धांडे, प्रा.विशाल जोगी, डॉ.डी. यू.राठोड,विज्ञान सैदाणे,सतीश पवार, एस.के.पाटील हे उपस्थित होते.

