नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.. विधान परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय सावंत यांचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री सहशिक्षण मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
![]()
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा..
विधान परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय सावंत यांचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री सहशिक्षण मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
१ नोव्हेंबर २००५ व नंतर नियुक्त राज्यातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना १९८२ नुसार अनुज्ञेय असलेली जुनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना नवीन नावाने म्हणजेच सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना नुसार शेवटच्या वेतनाच्या ५०% निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय २० सप्टेंबर २०२४ च्या शासन आदेशाने घेऊन १ मार्च २०२४ पासून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त २६५०० शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र प्रधान सचिव व दोन वेळा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तीन वेळा समिती नेमून अहवाल घेण्यामध्ये पाठीमागील पाच वर्षाचा कालावधी गेला आहे. राज्यातील सर्व विभागातील १८ लाख कर्मचाऱ्यांना महायुती सरकारने जुनी पेन्शन देण्याचा महत्वाचा निर्णय केला आहे. फक्त २६५०० कर्मचारी शालेय शिक्षण विभागातील राहिले आहेत याबाबत आपण आढावा घेऊन जुनी पेन्शन देण्याचा निर्णय करावा अशी कळकळीची विनंती विधान परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,अजित पवार सह शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे

