ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘कविकुलगुरू कालिदास दिन’ उत्साहात साजरा
1 min read

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘कविकुलगुरू कालिदास दिन’ उत्साहात साजरा

Loading

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘कविकुलगुरू कालिदास दिन’ उत्साहात साजरा

जळगांव प्रतिनिधी

जळगाव दि. १५/०७/२०२६ : के. सी. ई. सोसायटी, जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे महाकवी कालिदास यांच्या अद्वितीय साहित्यकृतींचे स्मरण आणि त्यांच्या साहित्यसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ‘कालिदास दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीचा गौरव, संस्कृत भाषेचे वैभव आणि कालिदासांच्या साहित्यामधून प्रकट होणारी जीवनमूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावीत, तसेच संस्कृत भाषेबद्दल आत्मीयता आणि अभिरुची निर्माण व्हावी या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे या होत्या. यावेळी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती प्रतिभा लोहार व ज्येष्ठ शिक्षक श्री निर्मल चतुर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रमुख वक्ते श्री निर्मल चतुर यांनी कालिदासांच्या साहित्याचे वैशिष्ट्य, संस्कृत व मराठी साहित्याची समृद्ध परंपरा आणि भारतीय संस्कृतीतील कालिदासांचे अद्वितीय स्थान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कालिदासांच्या साहित्यामधील निसर्गप्रेम, भाषेची माधुरी, मानवी मूल्ये आणि सांस्कृतिक जाणीव विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. महान साहित्यिकांचे विचार आणि कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यास त्यांच्यामध्ये संस्कार, सर्जनशीलता, भाषाप्रेम आणि राष्ट्राभिमान यांसारखी मूल्ये दृढ होतात, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील सुमित विजय सोनवणे व कुमारी रोहिणी चव्हाण यांनी प्रभावीपणे केले. यावेळी केतन गिरीश पाटील, कु. रिया महेश पाटील, कु. संस्कृती महाजन, कु. रेवती पांढरकर आणि कु. तेजश्री फक्कड यांनी कालिदासांचे व्यक्तिमत्त्व, संस्कृत भाषेचे महत्त्व आणि भारतीय साहित्यविश्वातील त्यांच्या अमूल्य योगदानावर मनोगते व्यक्त केली.
विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेविषयी आत्मीयता निर्माण करून भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेची ओळख करून देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती प्रतिभा लोहार व ज्येष्ठ शिक्षक श्री निर्मल चतुर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री वेदप्रकाश गडदे व श्री महेंद्र मिरकुटे यांच्या नियोजन आणि समन्वयातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना महाकवी कालिदास यांच्या साहित्यसंपदेचा परिचय होण्याबरोबरच संस्कृत भाषा, भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्यांविषयीची अभिरुची अधिक दृढ झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *