महात्मा फुले हायस्कूल मध्ये मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !…. , नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व याचा त्रिवेणी संगम म्हणजे जीवनआप्पा बयस -राजेंद्र पडोळ
1 min read

महात्मा फुले हायस्कूल मध्ये मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !…. , नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व याचा त्रिवेणी संगम म्हणजे जीवनआप्पा बयस -राजेंद्र पडोळ

Loading

महात्मा फुले हायस्कूल मध्ये मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !….

नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व याचा त्रिवेणी संगम म्हणजे जीवनआप्पा बयस -राजेंद्र पडोळ

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला सामाजिक – शैक्षणिक कार्य करण्याची ऊर्जा मिळते : जीवनसिंह बयस

धरणगाव प्रतिनिधी – (पी डी पाटील सर)
धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रस्ताविक शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशनचे अध्यक्ष जीवनसिंह बयस, सचिव मुकेशसिंह बयस, राजेंद्र पडोळ, गोविंदसिंह राजपुत उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज व मेवाडरत्न महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेच्या वतीने आलेल्या सर्व प्रमुख अतिथींचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या वाटप करण्यात आले. राजेंद्र पडोळ यांनी मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन ची सामाजिक कार्य विशद करत दरवर्षी आमची संस्था शहरातील गरिब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पेन, स्कूल बॅग, साईकल, शैक्षणिक साहित्य वाटप करीत असतो याचा फायदा गोरगरिबांना होतो याचा संस्थेला आनंद आहे.नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व याचा त्रिवेणी संगम म्हणजे जीवनआप्पा बयस असे प्रतिपादन पडोळ यांनी केले. आमच्या संस्थेतर्फे गोरगरीब मुलांना थोडीशी शैक्षणिक मदत आम्ही दरवर्षी करत असतो हे आमचे कर्तव्य आहे आम्ही समाजाचे देणे लागतो या भावनेने मदतीचा हात देत असतो मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आमचे समाधान असे प्रतिपादन जीवनआप्पा बयस यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी मंगलादेवी व मुन्नादेवी फाउंडेशनचे सामाजिक व शैक्षणिक कार्य खूप मोठे आहे आणि त्यांनी केलेले दातृत्व आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व पुढे घेऊन जाणारे आहे त्यांनी आमच्या शाळेवर असेच प्रेम करावे आणि मंगलादेवी व मुन्नादेवी संस्थेचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी डी पाटील तर आभार एस एन कोळी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *