अमळनेरात महिलांकडून संविधानाचा जागर कार्यक्रमाचे आयोजन
![]()
अमळनेरात महिलांकडून संविधानाचा जागर कार्यक्रमाचे आयोजन
अमळनेर- भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त 26 जानेवारी रोजी 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील बोधिसत्व महिला मंडळाच्या वतीने संविधानाचा जागर करण्यात आला. चमचाभर साखर करून भारतीय संविधानाचा जागर या उपक्रमांतर्गत बोधिसत्व महिला मंडळाच्या सौ. सुनिता हृदयनाथ मोरे आणि सौ. अनिता जयवंत संधानशिव यांनी ही संकल्पना राबविली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या दर्शना सरला अरुण पवार या होत्या. प्रमुख पाहुण्या शिवमती वैशाली शेवाळे, सौ. आरती श्याम पाटील, सौ. जय मला पाटील, तहसील कार्यालयातील सौ रुपाली अडकमोल, धरणगाव पंचायत समितीच्या भारती कोळी, आरोग्य सेविका माया हिरोडे, कुऱ्हे बु. सरपंच सौ नेहा बिऱ्हाडे, या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थितांना दर्शना पवार यांनी संविधानाबद्दल मार्गदर्शन केले. वैशालीशेवाळे यांनी महिलांची संवाद साधला. यावेळी उपस्थित महिलांना संविधानाच्या उद्देश पत्रिकेची प्रत आणि पेढा देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास मेघा मुंदडा, मोहिनी सिसोदे ,रंजना संदानशिव,ज्योती संदानशिव,कोमल थोरात, उषा गजरे सुनीता बिराडे ,उषा देवरे ,सुनंदा दिवटे ,रोहिणी शिरसाट, संगीता बिऱ्हाडे ,उषा जोगी, किरण पाटील, स्नेहजा अहिरे उपस्थित होत्या.


