रोटरी क्लब अमळनेर तर्फे “जॉय ऑफ लर्निंग” ची तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न*
1 min read

रोटरी क्लब अमळनेर तर्फे “जॉय ऑफ लर्निंग” ची तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न*

Loading

*रोटरी क्लब अमळनेर तर्फे “जॉय ऑफ लर्निंग” ची तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न*

 

अमळनेर-दिनांक २०,२१ व२२ डिसेंबर रोजी रोटरी क्लब अमळनेर तर्फे राॅयल ऊर्दू प्रायमरी स्कुल, राॅयल ऊर्दू हायस्कूल व राॅयल ऊर्दू ज्यु. काॅलेज ऑफ सायन्स येथे ३ दिवसीय जाॅय ऑफ लर्निंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे मार्गदर्शन पुणे येथील शिक्षण तज्ञ, लेखक तथा मोटिव्हेशनल स्पिकर प्रोफेसर मुज्ततबा लोखंडवाला यांनी मॅनेजमेंट, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना हसत खेळत कसे शिकायचे याचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमा मध्ये शिक्षकांनी, पालंकांनी व विद्यार्थ्यांनी भरपूर आनंदी वातावरणात जाॅय ऑफ लर्निंग चे धडे गिरवले. पालकांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते .यात पारंपरिक शिक्षण पद्धतीला छेद देऊन हसत खेळत कसे शिकावे व शिकवावे याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणा मुळे मानसिक ताण घेऊन आणि वैतागून शिक्षण सोडून देण्याचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात कमी होत आहे, कारण शिस्तीच्या नावाखाली इथे ताण नसतो.या कार्यशाळेत पाण्याची घनता कमी
असली तरी त्यावर अवजड वाहने उदाहरणार्थ जहाजे वगैरे का तरंगतात , फुगे आणि दोरी द्वारे रॉकेट विज्ञान यासारखे अनेक प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच विज्ञानाचे गोडी त्यांच्यात निर्माण झाली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे रोटरी क्लब अमळनेरचे अध्यक्ष ताहा बुकवाला, सौ निसरिन बुकवाला , प्रा. डॉ. दिलीप भावसार, मकसुद बोहरी, सौ. मेहराज बोहरी, संस्थेचे अध्यक्ष अखलाक शेख, मेराजुद्दीन शेख, अहतेशाम खान, इक्बाल शेख, नॅशनल हायस्कूल अमळनेर चे चेयरमैन ताहेर शेख, रमजान लोहार व समस्त मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे प्रिन्सिपल श्रीमती अलमास मॅडम, नाजीम सर, नविद सर जळगांव व समस्त शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *