प्रजासत्ताक दिवस महात्मा फुले हायस्कूलमध्ये रंगतदार साजरा!
1 min read

प्रजासत्ताक दिवस महात्मा फुले हायस्कूलमध्ये रंगतदार साजरा!

Loading

प्रजासत्ताक दिवस महात्मा फुले हायस्कूलमध्ये रंगतदार साजरा!


अमळनेर प्रतिनिधी
देवगाव देवळी, ता. अमळनेर येथील
महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या खास कार्यक्रमात शाळेचे ध्वजारोहण संस्थेचे उपाध्यक्ष दादासो नवल बापूराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,
कार्यक्रमाचे संचालन स्काऊट शिक्षक एस के महाजन यांनी केले, तर उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. यावेळी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी ध्वजगीत सादर केले, तर इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी राज्यगीत सादर करणे हा एक विशेष आकर्षणाचा भाग होता. संविधानाचे वाचन देखील करण्यात आले, ज्याने शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकाराची महत्त्वाची जाणीव करून दिली.
अमळनेर येथील प्रसिद्ध डॉक्टर जयेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप केले, याबद्दल मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमाला देवगाव देवळी एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ, जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, विकास सोसायटीचे चेअरमन,सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य, तसेच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांची देखील मोठी उपस्थिती होती, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिक रंगतदार आणि अर्थपूर्ण बनला. प्रजासत्ताक दिनाच्या या उत्सवाने सर्वांच्या मनात राष्ट्रीय भावना जागृत केल्या असून, एकजुट आणि सामर्थ्याचा संदेश दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक आय आर महाजन ,एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के, शिक्षकेत्तर कर्मचारी संभाजी पाटील, गुरूदास पाटील यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *