देवगाव देवळी हायस्कूलमध्ये ‘एक तास वाचण्यासाठी’ वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम संपन्न
![]()
देवगाव देवळी हायस्कूलमध्ये ‘एक तास वाचण्यासाठी’ वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन निर्णयानुसार वाचन संकल्प महाराष्ट्राच्या अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण शासन निर्णयानुसार अमळनेर तालुक्यातील शाळांमध्ये वाचन महोत्सव उपक्रम साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या माध्यमातून आयोजित उपक्रमामध्ये देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथील शाळेने ही आपला सहभाग नोंदवला..
पुज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर यांच्या माध्यमातून 1 जानेवारी ते 15 जानेवारी2025 या कालावधीत ‘एक तास वाचनासाठी’ हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अलीकडच्या काळात मुलं-मुली तरुण हे वाचन संस्कृती पासून दुरावत चाललेला आढळून येत आहे यासाठी 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत 1 तास वाटण्यासाठी असं वाचन संकल्प महाराष्ट्र चा हा उपक्रम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने अमळनेर तालुक्यातील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव देवळी येथील 50 विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून वाचलेल्या पुस्तकाचं उत्कृष्ट कथानक लिहून उद्देश सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनाच्या अध्यक्ष दिलीपराव सोनवणे,चिटणीस प्रकाश वाघ व संचालक मंडळाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे.. उत्कृष्ट तीन कथा नकास वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाणार आहे..
शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम घेण्यात आला. मराठी शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर नियोजन आय आर महाजन यांनी केले यशस्वी करण्यासाठी स्काऊट शिक्षक एच.ओ माळी,एस.के.महाजन यांनी प्रयत्न केले.



