धरणगावच्या सावित्रीच्या लेकीने शिक्षण क्षेत्रात घेतली उंच भरारी !…..  डॉ.प्रज्ञा महाजन इंग्रजी विषयात पी एच डी उत्तीर्ण
1 min read

धरणगावच्या सावित्रीच्या लेकीने शिक्षण क्षेत्रात घेतली उंच भरारी !….. डॉ.प्रज्ञा महाजन इंग्रजी विषयात पी एच डी उत्तीर्ण

Loading

धरणगावच्या सावित्रीच्या लेकीने शिक्षण क्षेत्रात घेतली उंच भरारी !…..

डॉ.प्रज्ञा महाजन इंग्रजी विषयात पी एच डी उत्तीर्ण

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेची माजी विद्यार्थिनी व सेवानिवृत्त शिक्षक एस ए महाजन सर यांची मुलगी डॉ. प्रज्ञा महाजन – अहिरे ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून इंग्रजी या विषयात पी एच डी उत्तीर्ण झाली. तिचा पी एच डी चा विषय ” इंडियन राईटर्स इन कॅनडियन डायस्पोरा अँड ॲनीटीसीस ऑफ एम जी वासनजी अँड अनिता राव बदामीच नोव्हेल्स ” हा होता. प्रज्ञा लहानपणापासूनच अतिशय हुशार व पुस्तकप्रेमी होती. प्रज्ञाचा शाळेत आवडता विषय इंग्रजी होता.
डॉ. प्रज्ञा महाजन पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण हे आजची बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा पूर्वीची पी आर सोसायटीची प्राथमिक शाळा धरणगाव येथे तर माध्यमिक शिक्षण सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे झाले. तिचे महाविद्यालय शिक्षण हे प्रताप कॉलेज अमळनेर येथे झाले. विशेष म्हणजे ती दोन मुलांची आई आहे तिची दोन्ही मुलं स्कॉलरशिप परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेली आहेत तिची मुलगी ओमेशा ही अबॅकस या विषयात अनेक पदक विजेती आहे.
डॉ.प्रज्ञा महाजन यांनी मिळवलेले यश हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आमचे विद्यार्थी – आमचा अभिमान असे प्रतिपादन महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद यांच्याकडून डॉ.प्रज्ञा महाजन यांचे अभिनंदन करण्यात आले आहे व पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ.प्रज्ञा महाजन यांचे या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *