नर्मदा मेडिकल फाउंडेशनमधील यशस्वी पित्ताशयाचे ऑपरेशन
![]()
नर्मदा मेडिकल फाउंडेशनमधील यशस्वी पित्ताशयाचे ऑपरेशन
अमळनेर प्रतिनिधी
नर्मदा मेडिकल फाउंडेशन, अमळनेर येथे अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचे ऑपरेशन (Laparoscopic Cholecystectomy) करण्यात आले, ज्यामध्ये १४ पित्ताशयाचे मोठे खडे यशस्वीरित्या काढण्यात आले.
या अद्वितीय कार्यात डॉक्टरांच्या संघाने एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांनी ही प्रक्रिया संपन्न झाली. यामध्ये डॉ अनिल शिंदे, डॉ सौरव पाटील, डॉ संदीप जोशी, डॉ मयूर महाजन, डॉ उमाकांत बारी, डॉ मयुरी जोशी, डॉ अर्जुन पावरा, डॉ परेश पाटील, डॉ सुरेश खैरनार, डॉ वैष्णवी परदेशी, डॉ तेजस पाटील, अलीम शेख आणि संदीप पाटील यांचा समावेश होता.
हे ऑपरेशन रुग्णाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले असून, यामुळे संबंधित रुग्णाला लवकरच आरोग्य लाभणार आहे. डॉ. अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यामुळे नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या कार्याची व प्रतिष्ठेची अजून एक उदाहरण समोर आली आहे.
आरोग्य क्षेत्रातील या महत्त्वाच्या यशाबद्दल सर्व डॉक्टरांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

