साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण निमित्ताने अभिवादन
1 min read

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण निमित्ताने अभिवादन

Loading

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण निमित्ताने अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील होते.
भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी याकरिता विद्यार्थी यश पाटील, शिक्षक देवेंद्र पाटील, आणि मनीष उघडे यांनी महत्वपूर्ण विचार व्यक्त केले.
मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हटले की, “बाबासाहेबांनी गुलामगिरी मुक्तीचा महामंत्र या जगाला दिला. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेसच चालण्या बोलण्याचे नियम सुद्धा दिले. तथापि, त्या स्वातंत्र्याचा आपण आवश्यक असलेल्या मर्यादेतच वापर केला पाहिजे.” त्यांनी भारतीय संविधानाचा काटेकोरपणे अवलंब करण्याची अपेक्षा सर्व विद्यार्थ्यांपुढे ठेवली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी, डी ए धनगर, समाधान पाटील, मीना धनगर, यशोदा महाले आणि इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते माल्या अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाने समतेचा व बंधुतेचा संदेश सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला असून, बाबासाहेबांच्या विचारांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *