कळमसरे येथे भव्य श्री दत्त जयंती उत्सव: अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन
1 min read

कळमसरे येथे भव्य श्री दत्त जयंती उत्सव: अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन

Loading

कळमसरे येथे भव्य श्री दत्त जयंती उत्सव: अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सर्व धर्मनुरागी समाज बांधवांना आमंत्रित करण्यात आनंद वाटतो की आमच्या येथे सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा कळमसरे तालुका अमळनेर येथे श्री दत्त जयंती निमित्ताने भगवंताच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने वै. ह. भ .प विठ्ठल महाराज चौधरी (मोठे बाबा) तसेच वै ह.भ.प अंबादास महाराज कळमसरे यांच्या प्रेरणेने तसेच प.पू हंसानंद महाराज कपिलेश्वर मठापती यांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे तरी कळमसरे व आजूबाजूची सर्व ग्रामीण भागातील बंधू-भगिनींनी उपस्थित राहून ज्ञानदानाचा लाभ घ्यावा असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
मार्गशीर्ष शु रविवार दिनांक 8 डिसेंबर ते मार्गशिर्ष शु पौर्णिमा रविवार दिनांक 15 डिसेंबर पर्यंत आहे. कथाकार प.पू कृष्णदास महाराज ,नांदेड (राम मंदिर)
8 डिसेंबर रविवार ह भ प अतुल महाराज नारणेकर, 9 डिसेंबर सोमवार ह भ प भानुदास महाराज पाटील भुसावळ, 10 डिसेंबर मंगळवार हभप पंकज महाराज पवार अमरावती, 11 डिसेंबर बुधवार ह भ प अमोल महाराज घुगे अकोला, १२ डिसेंबर गुरुवार ह भ प लक्ष्मण महाराज शास्त्री खेडी भोकर, 13 डिसेंबर शुक्रवार ह भ प पंकज महाराज देशमुख हिंगोली, 14 डिसेंबर शनिवार हभप चकोर महाराज शास्त्री बाविस्कर जिल्हा न्यायाधीश अकोट, 15 डिसेंबर रविवार ह भ प किशोर महाराज पाटील तळवेल यांचे कार्यालयाचे कीर्तन सकाळी 9 ते 11 यांचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तर गायनचार्य ह भ प वैभव महाराज काळे आळंदी, हभप रवींद्र महाराज लामकाणी, मृदंगाचार्य ह.भ.प पावभा महाराज वैदाने ,विणेकरी ह.भ.प निवृत्ती महाराज कळमसरे तर व्यवस्थापक गुरुदत्त मंदिर ट्रस्ट ग्रामस्थ तरुण मंडळ माऊली परिवार कळमसरे तर विशेष उपस्थिती खानदेश वारकरी सेवा मंडळ जळगाव धुळे नंदुरबार पंचक्रोशीतील भजनी मंडळ कार्यक्रमास हजर राहणार आहेत तर पत्रिका सौजन्य धनश्री ऍग्रो एजन्सी, गुरुकृपा इरिगेशन प्रायव्हेट लिमिटेड अवधान धुळे प्रोप्रायटर मधुकर कथ्थू पाटील, राजू गांधी मार्केट जुने बस स्टँड अमळनेर तर गायनाचार्य हवप जयेश महाराजांनी ह भ प सागर महाराजांनी श्रीराम भजनी मंडळ कळमसरे बालगोपाळ भजनी मंडळ मृदुंगाचार्य हभप बजरंग महाराज कळमसरे, श्री ह भ प सुनील महाराज कळमसरे ,ह.भ.प दिनेश महाराज निम,
मंडप साउंड सर्विस माऊली साउंड मंडप डेकोरेटर्स योगेश माळी कळमसरे ,झाकी माऊली झाकी, प्रा ह.भ.प हरीश महाराज कळमसरे यांचे सहकार्य लाभणार आहे तरी कळमसरे परिसरातील जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह चा लाभ घ्यावा असे श्री दत्त जयंती सेवा संस्थांनचे अध्यक्ष प्रमोद चौधरी व संचालक मंडळ यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *