साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन
![]()
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका श्रीमती अनिता दिपक बोरसे यांनी भुषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी मांडले की महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या प्रमाणे प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करून आपले शिक्षणाचे ध्येय साध्य केले, त्याप्रमाणे आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत . यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी अभिवादन केले .

