महामानव विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
1 min read

महामानव विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!

Loading

महामानव विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!

भीमराव रामजी आंबेडकर /शशिकांत हिंगोणेकर

सूर्यफुलांच्या विश्वविद्यालयाचा कुलगुरू
मोडेन पण वाकणार नाही
आहे या बाण्याचा.

त्याला
तुम्ही मोडूही शकत नाही
आणि वाकवूही शकत नाही.

त्याने
मोडले आहे
तुमच्या पिढ्यान्-पिढ्यांच्या
लेखणीचे कंबरडे
अस्मितेचे लक्ष लक्ष
प्रकाशदिवे पेटवून.

त्याच्या
लेखणीच्या
विद्रोही विचारधारांनी
तुम्ही पुरते घायाळ
झाला आहात
ही गोष्ट
न लपणारी आहे
तुम्ही कितीही दाबून ठेवली तरी.

कुलगुरू पदावरून
हटविण्याचे, मिटविण्याचे
तुम्ही कितीही कट शिजवले
तरी
शिजणार नाही आता
तुमच्या कटाची डाळ

फुसक्या निखा-यांनी
साधे पाणीही उकळले जात नाही
एवढे कसे तुमच्या
ध्यानी-मनी नाही.

तुमच्याच लेखण्या
तुमच्याच कुबड्या
तुमचीच दुकानदारी
आणि धंदेवाईक
मक्तेदारीही तुमचीच

तुमच्या
या शब्दांच्या दंडुकेशाहीचा
दंडूकाच
कुलगुरूने
तुमच्या पाठीवर
फोडून टाकला आहे
मोडून टाकला आहे.

या अनावर रागानेच
तुम्ही टाळू शकता
तुमच्या शब्द संमेलनात
त्याच्या अस्तित्वाची धग

तुमच्या शब्द संमेलनात
तो असला
नसला तरी
त्याच्या धगेनेच
जळते आहे
तुमचे वर्णवादी विद्यापीठ
हे
टाळू शकत नाही
तुम्ही आता.

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *