“जीवनातील संघर्ष आणि प्रामाणिकतेचे बळ: किशोर भोईने खात्यावर आलेले पाच लाख रुपये केले परत अमळनेर तालुक्यात त्याचे होत आहे सर्वत्र अभिनंदन..!!
![]()
“जीवनातील संघर्ष आणि प्रामाणिकतेचे बळ:
किशोर भोईने खात्यावर आलेले पाच लाख रुपये केले परत
अमळनेर तालुक्यात त्याचे होत आहे सर्वत्र अभिनंदन..!!
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर शहरामध्ये गीता प्रोव्हिजन जवळ श्री कृपा वेफर्स चे दुकान लोड गाडीवर चालवणारा किशोर भैय्या हा आपल्या कुटुंबाचा प्रामाणिकपणे राहटगाडे चालवतो.. कालच अचानक त्याच्या खात्यावर पाच लाख रुपये क्रेडिट झाल्यामुळे तो आवक झाला. की पैसे आले कुठून? याचा शहानिशा करण्यासाठी त्याने बँकेत गेला.. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले त्याचे हा प्रामाणिकपणाबद्दल अमळनेर तालुक्यात अभिनंदन व कौतुक होत आहे..
सविस्तर माहिती अशी कि अमळनेरमध्ये असलेल्या श्रीकृपा केळी,बटाटा वेफर्सच्या दुकानात कार्यरत असतांनाही, किशोरने आपल्या कुटुंबाच्या आर्थिक अवस्थेला न बघता, प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता जपली.
बँकेत आलेले पाच लाख रुपये कोणत्या संदर्भात आहेत ते जाणून घेण्यासाठी त्याने जे तत्परतेने बँकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले..
बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याने लवकरात लवकर त्या पैशांची माहिती मिळवली आणि त्या व्यक्तीच्या खात्यात ते पैसे परत केले.
या प्रसंगामुळे समाजातील प्रामाणिकता आणि नीतिमत्ता यांचे महत्व अधोरेखित होते. किशोरच्या या कार्यामुळे बँकेतील अधिकाऱ्यांनी आणि बजरंगशेठ अग्रवाल यांनी त्याचे कौतुक केले, ज्यामुळे समाजात चांगल्या वर्तनाचे एक आदर्श उदाहरण निर्माण झाले.
अशा प्रकारच्या व्यक्तींमुळे आपल्याला विश्वास बसतो की प्रामाणिकपणा आणि नैतिकतेचे मूल्य कधीही कमी होत नाही. किशोरच्या कृत्यामुळे समाजातील अगदी सामान्य व्यक्ती देखील महत्त्वाचे कार्य करू शकतात आणि चांगल्या गोष्टींची एकत्रित भावना जपून राहू शकते. त्याच्या या कर्तृत्वाचे आणि आचारधर्माचे सर्वत्र स्वागत केले पाहिजे!


